सहकाऱ्यांनी केले विवस्त्र फोटो काढून ब्लॅकमेल, तरुणाने घेतला गळफास

डहाणू : पोलीसनामा ऑनलाईन – सहकाऱ्यांनीच विवस्त्र फोटो काढून ब्लॅकमेल करत पैशांची मागणी केले. त्यानंतर पैसे न दिल्यास बदनामीची धमकी दिल्याने त्रासाला कंटाळून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

राहूल मिश्रा असे तरुणाचे नाव आहे. याप्रकऱणी त्याच्या भावाने वाणगाव पोलीस  ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल मिश्रा हा बोईसर एमआयडीसीमध्ये नकरी आहे. तो आरती ड्रग्ज या कंपनीत काम करत होता. दरम्यान तो दोन सहकाऱ्यांसोबत शिवाजीनगर भागात फ्लॅट घेऊन राहात होता. त्यावेळी तेथे ते पार्टी करून झोपले तेव्हा दोघांनी त्याचे विवस्त्रावस्थेतील फोटो मोबाईलवर काढले. त्यानंतर त्याचे चित्रिकरणही केले. त्यानंतर दोघांना त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. ती पुर्ण न केल्यास सोशल मिडीयावर बदनामी करण्याची धमकी दिली. त्यानंतर तो पैसे देण्यास असमर्थ ठरल्याने रविवारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

 

 

 

 

Loading...
You might also like