नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकांना गंडा घालण्यासाठी भामटे नवनवीन पद्धतीचा वापर करत आहेत. लोकांच्या स्मार्टफोनमधून डेटा चोरण्यासाठी हॅकर्स नवी पद्धत शोधत आहेत. आता हॅकर्सनी नवीन अँड्रॉयड मालवेयरला तयार केले आहे. जे एकासोबत सर्व डेटा चोरू शकतात. या मेलवेयरचे नाव BlackRock आहे. यावर्षीच्या मे महिन्यात हे समोर आले होते. रिपोर्टच्या माहितीनुसार, हॅकर्स 337 अॅप्सद्वारे युजर्संना आपले लक्ष्य करत आहेत. ज्यामध्ये मेलवेयर उपलब्ध आहे.
ThreatFabric च्या रिपोर्टनुसार हे मेलवेयर दुसऱ्या बँकिंग ट्रोजन प्रमाणे काम करतात. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे जे अॅप्सला टार्गेट करु शकतो. हे केवळ युजर्संची लॉगिन क्रेडिंशियल (यूजरनेम आणि पासवर्ड) चोरत नाहीत तर त्यातील पेमेंट कार्डसचे डिटेल्स टाकण्यासाठी भाग पाडतो.
मेलवेयर असे करते काम
हे मेलवेयर तुमच्या डिव्हाईसमध्ये सर्वात आधी अॅप ड्रोअर पासून आयकॉन लपवतो. त्यामुळे युजर्सला माहिती होत नाही की त्यांनी कोणत्या अॅपपासून धोका निर्माण होत आहे. दुसऱ्या स्टेपला तुमच्या फोनच्या Accessibility फीचरला ऑन करतो. त्यानंतर गुगल अपडेटच्या नावावर फोनचा पूर्ण अॅस्केस मागतो. त्यानंर फोनमध्ये काही सेव्ह केल्यास त्याची माहिती हॅकर्सला कळते.
377 अॅपची यादी जारी
ThreatFabric ने आपल्या रिपोर्टमध्ये 337 अॅप्सची यादी जारी केली आहे. युजर्संचा पासवर्ड आणि बँकिंग कार्ड डेटा चोरण्याचे काम हे अॅप्स करीत असतात. हॅकर्स यातून डेटिंगपासून न्यूज, शॉपिंग, लाईफस्टईल आणि प्रोडक्टिविटी सारख्या अॅप्सचा वापर करत असतात.