Pune News : मराठा उद्योजक लॉबीच्या वतीने राज्यात 27 ठिकाणी रक्तदान शिबीर संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात रुग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने प्रशासनाकडून राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा उद्योजक लॉबीच्या वतीने राज्यभरात रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. संपूर्ण राज्यात जिल्हा व तालुका स्तरावर 27 ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तर पुणे शहरात हडपसर व ग्रामीणमध्ये मंचर, आंबेगाव येथे रक्तदान शिबीराचे नियोजन करण्यात आले होते.

मराठा उद्योजक लॉबीचे संस्थापक विनोदबढे, कार्याध्यक्ष स्वप्नील काळे व कोअर कमिटीच्या निर्णयानुसार मराठा उद्योजक लॉबी पुणे शहर व जिल्हा मुख्य ॲडमीन केडी उर्फ कुलदीप पाटील यांनी जिल्ह्यात दोन ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. पुणे शहरामध्ये हडपसर व ग्रामीणमध्ये मंचर, आंबेगाव येथे रक्तदान शिबीराचे नियोजन करण्यात आले.या महारक्तदान शिबीरास पुणे आणि ग्रामीणमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. पुणे शहर व जिल्हा येथे 78 पेक्षा अधिक बॅग रक्त संकलित करण्यात आले.

ऐनवेळी अनेक विघ्न आली परंतु जेव्हा छत्रपती शिवराय हे शक्तीदाता पाठीशी असतात तेव्हा संकटे पण आव्हान वाटू लागतात आणि लढून त्या आव्हानांना परतवून लावायची प्रेरणा मिळते. या यशामागे खरंतर अनेकांचे अमूल्य योगदान व प्रचंड मेहनत आहे. सर्व बंधू-भगिनींच्या अथक प्रयत्नांचे, खंबीर साथीचे आणि एकनिष्ठ एकजुटीचे हे प्रतीक असल्याचे केडी उर्फ कुलदीप पाटील यांनी सांगितले.

या नियोजनात चिंतेश्वर देवरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख उदय भक्ते व वैभव फरतडे, MUL पुणे टीम (शहर व ग्रामीण), MUL मिडीया, कॅल्सी उद्योगसमूहाच्या श्रीमती कल्याणी, नोबेल हॉस्पिटलचे वाळूंज, मंचर मधील विनोद तसेच सिटी हॉस्पिटल, मंचर. कॅल्सी उद्योग समूह, ए आर लॅबडोर पुणे, MUL आंबेगाव टीम, पुणे ब्लड बँक आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.