BMC Corona Vaccination : 15 आणि 16 मे रोजी मुंबईत लसीकरण नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे 18 वर्षावरील नागरिकांचंही लसीकरण 1 मे पासून सुरु करण्यात आले आहे. मात्र, सध्या लसींचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे लसींची टंचाई पाहता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान 15 आणि 16 मे रोजी मुंबईत लसीकरण प्रक्रिया बंद ठेवण्या येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेने ट्विट करुन माहिती देताना म्हटले आहे की, मुंबईकरांनो, आम्ही सुचित करु इच्छितो की 15 आणि 16 मे 2021 रोजी लसीकरण प्रक्रिया बंद ठेवण्यात येणार आहे. लसीकरणाविषयी पुढील माहिती आपल्याला लवकच कळवण्यात येईल, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुंबईत रुग्णांची संख्या कमी होताना पहायला मिळत आहे. मुंबईत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी घट होत आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 1657 नवी रुग्ण आढळून आले आहेत. तर 2572 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92 टक्क्यांवर आले आहे. मुंबईत सध्या 37 हजार 656 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा 199 दिवसांवर गेला आहे.