BMC Covid Scam | एसआयटी पथक ॲक्शन मोडमध्ये; कॅग अहवालानंतर मुंबई महापालिका मुख्यालयात चौकशीला वेग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BMC Covid Scam | कोरोनाच्या महामारीमध्ये (Corona) मुंबई महानगरपालिकेच्या 12 हजार कोटींच्या कारभाराबाबत (BMC Covid Scam) कॅगचा (CAG) अहवाल अर्थसंकल्पी अधिवेशनात (Budget Session) सादर करण्यात आला होता. या कॅग अहवालात मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) कोरोना काळातील कारभारामध्ये अनियमितता आढळल्याचे समोर आले होते. आता घोटाळा प्रकरणात (Covid Scam) एसआयटी (SIT) स्थापन झाल्यानंतर प्रथमच महापालिका मुख्यालयात एसआयटीच्या पथकाने चौकशी केली आहे. जवळपास एक ते दीड तास या पथकाने विविध विभागातील कारभाराची माहिती घेतल्याचे समजते.

 

एसआयटी पथकाने सुधार विभागातील सहआयुक्तांकडे मुंबई महापालिकेतील कारभारासंदर्भात (BMC Covid Scam) चौकशी केली आहे. कथित घोटाळा प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जून महिन्यात एसआयटीमार्फत चौकशी (Inquiry By SIT) करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मुंबई महापालिकेचे मुख्य अभियंता (नियोजन) सुनील राठोड (Sunil Rathod) यांच्या दालनात हे एसआयटीचे पथक (SIT Team) दाखल झाले होते. त्या ठिकाणीसुद्धा या पथकाने या विभागातील कारभाराबाबत चौकशी केली होती.

 

एकीकडे ईडी (ED) कथित कोविड घोटाळ्याची चौकशी करत आहे. दुसरीकडे, आता एसआयटी ही ॲक्शन मोडमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना एसआयटीच्या तपासात आणखी काय माहिती मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने (EoW Mumbai Police) कॅगच्या अहवालासंदर्भात मुंबई महापालिका
अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवले होते. या अधिकाऱ्यांकडून अधिकची माहिती मिळवली असल्याचे सांगण्यात येत आहे.
या सर्व चौकशीसंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त संग्राम सिंग निशाणदार (DCP Sangram Singh Nishandar)
यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार दिला होता. त्याचप्रामाणे हा एसआयटी चौकशीचा भाग असल्याचे ही त्यांनी सांगितले होते.
तसेच विविध विभागांची ही चौकशी सुरु राहणार असून कॅगच्या अहवालानुसार ही चौकशी केली जात असल्याचे ही त्यांनी म्हटले होते.

 

 

 

Web Title :  BMC Covid Scam | sit team in action mode in case of alleged bmc covid scam

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा