Pune Accident News | पुण्यात भीषण अपघात; दुभाजक तोडून केमिकलने भरलेला टँकर पलटी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Solapur National Highway) उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील एलाईट चौकात भरलेला केमिकलचा टँकर पलटी (Pune Accident News) झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी टँकर (Chemical Tanker) आणि दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

समोर आलेल्या माहितीनुसार, केमिकलचा टँकर सोलापूरच्या दिशेने निघाला होता. यावेळी वाहनांना ओव्हरटेक (Overtake) करण्याच्या नादात चालकाचे टँकर वरील नियंत्रण सुटले आणि टँकर दुभाजक (Divisor) तोडून रस्त्यावर पलटी झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. चालकाने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने टँकर चालवून रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांचे मोठे नुकसान झाले.

ही घटना घडल्यानंतर तात्काळ रुग्णवाहिका (Ambulance), स्थानिक नागरिकांनी (Local Citizens) घटनास्थळी पोहोचले.
खबरदारीचा उपाय म्हणून चालकाची चौकशी केली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे.

 

Web Title :  Pune Accident News | pune solapur highway chemical tanker accident

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा