‘नोटांवरुन गांधींचा फोटो हटवा, पुतळे पाडा…थँक्यू गोडसे’, ‘त्या’ महिला IASअधिकार्‍याच्या ट्विटवरुन वाद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मागे काही महिन्यांपूर्वी नथुराम गोडसे आणि महात्मा गांधीजी यांच्या समर्थकांमध्ये वाद झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी आता पुन्हा असाच काहीसा वादाला तोंड फुटले आहे. महात्मा गांधींचा फोटो नोटांवरुन काढा, पुतळे पाडा, थँक्यू गोडसे…’

अशा अर्थाचे वादग्रस्त ट्वीट मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त (विशेष) आणि सनदी अधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. त्यानंतर वादाला सुरुवात झाली आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे त्या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहे.

‘महात्मा गांधी यांची 150 वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. पण, आता वेळ आली आहे…जे रस्ते, संस्थांना गांधींचे नाव दिले आहे, ते काढून टाकावे…जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत…तसेच नोटांवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा…हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल…30-1-1948 साठी थँक्यू गोडसे, असं ट्वीट १७ मे रोजी नीधी चौधरी यांनी केले.

त्यासोबत त्यांनी गांधीजींच्या पार्थिवाचं छायाचित्र शेअर केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर हे ट्वीट व्हायरलं झाले. त्यावर लोकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर निधी यांनी आपले ट्वीट डिलीट केले.

ट्वीट डिलीट केल्यानंतर निधी यांनी त्यावर स्पष्टीकरण करणारे ट्वीट केले. काही लोकांचा गैरसमज झाल्यामुळे मी गांधीजींबाबतचं ट्वीट डिलीट केलं आहे. तुम्ही 2011 पासून माझी टाईमलाईन पाहिलीत, तर त्यांना समजेल, की मी गांधीजींचा अवमान करण्याचा स्वप्नातही विचार करु शकत नाही. माझे ट्वीट व्यंगात्मक होते.

आंदोलन करणाऱ्यांनी ते पूर्ण वाचलेले नाही. त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो आहे. गांधीजींवर माझी अपार श्रद्धा आहे. माझ्याकडून त्यांचा अवमान होणे शक्यच नाही. गांधीजींवर यापूर्वी मी अनेकदा ट्वीट केले आहे, ती पाहू शकता. गांधीजी या देशात जन्माला आले, याबाबत आपण देवाचे आभार मानले पाहिजेत, असे ट्वीट मी यापूर्वी केलेले आहेत. त्यामुळे गांधीजींची हत्या करणाऱ्याचे समर्थन मी कधीच करणार नाही. काही लोक या ट्वीटचा राजकीय लाभ उठवू पाहात आहेत, हे दुर्दैवी आहे, असं निधी चौधरी यांनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं.

दरम्यान, निधी यांच्या ट्वीटवरून ‘राष्ट्रपित्याचा अपमान करणाऱ्या चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करा’ अशी मागणी लोकांनी केली आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही निधी चौधरी यांची महापालिकेच्या सेवेतून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

https://twitter.com/nidhichoudhari/status/1134520012398456832