BMC ची नवी नियमावली जारी ! लग्न, नववर्षाच्या पार्ट्यांत ठेवा 6 फुटांचे अंतर; 200 व्यक्तींच्या कार्यक्रमासाठीही नियम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BMC | कोरोनाच्या दोन्ही लाटेनंतर राज्यात कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Omicron variant) शिरकाव केला. या पार्श्वभुमीवर राज्य सरकार खबरदारी घेत आहे. महाराष्ट्रात काही प्रमाणात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले. या पार्श्वभुमीवर मुंबईतील नाताळ आणि नववर्षाच्या पार्ट्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुुंबई महापालिकेकडून (BMC) नवी नियमावली (New rules) जारी करण्यात आली आहे. या नियमानूसार एखाद्या कार्यक्रमात 200 व्यक्ती जमणार असल्यास स्थानिक सहाय्यक पालिका आयुक्तांची (Assistant Municipal Commissioner) परवानगी बंधणकारक असणार आहे.

 

सणाच्या पार्श्वभुमीवर मुंबई महापालिकेच्या (BMC ) नव्या नियमानूसार कोणत्याही कार्यक्रमांमध्ये 2 व्यक्तींमध्ये 6 फुटांचे अंतर ठेवावे लागणार आहे. परंतु, एखाद्या कार्यक्रमात 2 व्यक्तींमध्ये 6 फुटांचे अंतर राखणे शक्य आहे का?, असा सवाल देखील निर्माण होतो आहे. दरम्यान, यापुर्वी 1 हजार व्यक्ती जमणार असल्यास त्यासाठी सहायक पालिका आयुक्तांची परवानगी घेणे गरजेच होते. यामध्ये बदल करुन हा नियम 200 व्यक्तींसाठी लागू केला गेला. याबाबत सुधारित नियमावली मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल (BMC Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी जारी केले आहे.

मुंबईत ओमायक्रॉनच्या पार्श्वभुमीवर काही नवे नियम –

– लग्नसोहळे, कार्यक्रम, पार्ट्या किंवा तत्सम कोणतेही कार्यक्रम बंदिस्त जागेत असल्यास 50 टक्के उपस्थिती.

– मोकळ्या जागेत होणाऱ्या कार्यक्रमांसाठी 25 टक्के

– त्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझेशनची व्यवस्था असावी.

– एकत्र जमणाऱ्या व्यक्तींमध्ये 6 फुटांचे अंतर असावे.

 

दरम्यान, पालिकेचा सुधारित नियम (Mumbai Municipal Corporation) प्रत्यक्षात अवलंबणे म्हणजे कडेलोट असल्याची प्रतिक्रिया धनश्री कॅटेरर्सचे पराग साठे यांनी दिली. या काळात लग्नासह अन्य कार्यक्रम आयोजित केले असतील त्यांची पंचाईत होणार असल्याचे म्हटले आहे. हा नियम आयोजकांसह व्यवसायावर विपरित परिणाम करेल, अशी देखील भीती व्यक्त केली जातेय. तसेच, नेमका हा नियम सभागृहाच्या आयोजकांप्रमाणे तिथे कॅटरिंग व्यवस्थापनासाठी कठीण होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होतेय. राजकीय समारंभ, लोकल-बस सेवा, बाजारपेठा अशा सर्वच ठिकाणी गर्दी होत असते, तेव्हा 6 फुटांचा नियम का बंधनकारक केला जात नाही?, असा सवाल उपस्थित केला जातोय.

 

Web Title :- BMC | Mumbai municipal corporation issues new rules to control christmas and new year parties bmc

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

आता जुने चॅट आणि कॉन्टॅक्ट न गमावता कसा बदलायचा WhatsApp नंबर? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

MahaTET Exam Scam Case | पुणे पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई, GA Software कंपनीचा सौरभ त्रिपाठी ताब्यात

Pune Crime | 24 वर्षीय तरूणीची 4 मजली इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या, पुण्याच्या वाकड परिसरातील घटना