वाहतुक पोलिसांसाठी आता ‘बॉडी कॅमेरा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वाहतुक पोलिसांना वाहन चालकांकडून होत असलेल्या मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेने पोलिसांना ‘बॉडी कॅमेरा’ देण्यात आला आहे. यामुळे पोलिसांशी हुज्जत घालणाच्या घटनांना आळा बसणार आहे.

वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांकडून पोलिसांना मारहाण करण्यात येते. तसेच काहीवेळा पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकार घडले आहेत आणि घडत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी वाहतुकीचे नियमन करणाऱ्या प्रत्येक पोलीसाला बॉडी कॅमेरे देण्यात आले आहेत.

अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत आणि सुरक्षीत चालण्यासाठी वाहतूक शाखेकडून अनेक उपाय योजना केल्या जातात. विशेष मोहीम राबवून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात येते. ही कारवाई करत असताना काही वाहनचालक हे वाहतुक शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाद-विवाद घालतात. तसेच धमक्या देत असतात. त्यामुळे वाहतुक नियमन व कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांना अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून वाहतूक शाखेतर्फे वाहतुक पोलीस कर्मचाऱ्यांना बॉडी कॅमेरे पुरविण्यात आले आहेत. बॉडी कॅमेऱ्याचा वापर करुन संबंधीत नियमभंग करणाऱ्या व वाद-विवाद करणाऱ्या वाहन चालकाचे व्हिडीओ रेकॉर्डींग करण्यात येणार आहे. हे रेकॉर्डींगचा वापर संबंधीत वाहन चालकावर कायदेशीर कारवाई करुन पुरवा म्हणून वापर करण्यात येणार आहे.

बॉडी कॅमेऱ्यामुळे बेशीस्त वाहन चालकांना लगाम लागणार आहे. यपुढे जर कोणी वाहतुक पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना धक्का बुक्की केली तर त्याचे रेकॉर्डींग होणार असून वाहन चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळून वाहतुक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.