Photos : तेजस्विनी पंडितनं शेअर केले खूपच ‘बोल्ड’ फोटो ! सोशलवर तुफान व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठी ॲक्ट्रेस तेजस्वीनी पंडित (Tejaswini Pandit) कायमच सोशलवर सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती कायमच चाहत्यांसोबत शेअर करत असते. अनेकदा तिनं आपला बोल्ड आणि ग्लॅमरस लुकही चाहत्यांना दाखवला आहे. आपल्या काही फोटोंमुळं ती चर्चेत आली आहे.

तेजस्विनीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात तिचा बोल्ड अवतार दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं बॅकलेस ब्लाऊज आणि साडी घातली आहे. साडीतही तिनं आपल्या लुकला बोल्डनेसचा तडका दिला आहे.

सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांनीही तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. काहींनी हे फोटो शेअरही केले आहेत. अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुकही केलं आहे. अनेक चाहत्यांना तिचा लुक आवडला आहे.

तेजस्विनीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिची आई ज्योती चांदेकर या मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी नाटकांसह अनेक सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.

तेजस्विनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अगं बाई अरेच्चा या केदार शिंदेंच्या सिनेमातून तिनं करिअरला सुरुवात केली होती. मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे अशा काही सिनेमात तिनं काम केलं आहे. ती 100 डेज या मालिकेतही दिसली आहे. इतकंच नाही तर नाटकं आणि लहान पडद्यावरदेखील तिनं भूमिका साकारल्या आहेत.