‘काजोल’चा ‘देवी’ सिनेमा पाहून येईल डोळ्यात पाणी, 13 मिनिटांत दाखवलं 9 महिलांचं ‘दु:ख’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – तान्हाजी: द अनसंग वॉरियर सिनेमात आपल्या लुक आणि अ‍ॅक्टींगनं सर्वांचं मन जिंकणारी काजोल आपल्या नव्या प्रोजक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. काजोलच्या ‘देवी’ या शॉर्ट फिल्मची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. 13 मिनिटांची ही शॉर्ट फिल्म पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. प्रियंका बॅनर्जीनं डायरेक्ट केलेली ही शॉर्ट फिल्म आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं युट्युबवर रिलीज करण्यात आली आहे. काजोल व्यतिरीक्त या सिनेमात नेहा धुपिया, श्रुती हसन, शिवानी रघुवंशी, नीना कुलकर्णी, संध्या म्हात्रे, रमा जोशी, मुक्ता बर्वे, रश्विनी दयामा अशा अनेक अभिनेत्रींनी रोल केला आहे.

या शॉर्टफिल्ममध्ये एकूण 9 महिलांची स्टोरी आहे ज्या वेगवेगळ्या परिस्थितीतून बाहेर पडत अशा ठिकाणी आल्या आहेत जिथे त्यांचं कोणीच नाहीये. खास बात अशी की, प्रत्येक महिला पुरुषप्रधान समाजातील पुरुषाच्या ‘मर्दानगी’ची शिकार झालेली आहे. 13 मिनिटात 9 महिलांनी आपलं दु:ख मांडलं आहे. दरवाजावरील बेल वाजल्यानंतर पीडितेच दु:ख पुन्हा उकरलं जातं आणि दरवाजा उघडल्यानंतर जे काही समोर येतं ते पाहून सारेच अवाक् होतात.

ही फिल्म तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते यात शंका नाही. काजोलनं या सिनेमात सूत्रधाराची भूमिका साकारली आहे. महिला दिनाच्या निमित्तानं ही शॉर्टफिल्म रिलीज करण्यात आली आहे.