अभय देओलनं काढली बॉलिवूडविरोधातील भडास, म्हणाला- ‘अवॉर्ड्सनं हृतिकला लिड आणि मला सपोर्टींग अ‍ॅक्टर बनवलं’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता घराणेशाहीचा मुद्दा जोरावर आहे. अनेकजणांचं म्हणणं हे की, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी इंडस्ट्रीत टिकणं काही लोक मुश्किल करत आहेत. इतकंच नाही तर इतरही अनेक लोक बोलते झाले आहेत आणि आपले इंडस्ट्रीतले अनुभव सांगत आहेत. बॉलिवूड स्टार अभय देओल यानंही त्याचा अनुभव सांगितला आहे. इंडस्ट्रीच्या विरोधात त्यानं आपलं म्हणणं मांडलं आहे.

काय म्हणाला अभय देओल ?

अभयनं त्याच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभय म्हणतो, “जिंदगी ना मिलेगी दोबारा हा सिनिनेमा 2011 साली रिलीज झाला होता. आजकाल मी याच सिनेमाचं नाव माझ्यासाठी जपत असतो. मी जेव्हा खूप चिंतीत किंवा तणावात असतो तेव्हा हा सिनेमा पहात असतो. मला हा उल्लेख करायचा आहे की, सर्व अवॉर्ड फंक्शननं मला आणि फरहानला मेन लिड्सनं डिमोट केलं आहे. आम्हाला सपोर्टींग अॅक्टर म्हणून नॉमिनेट करण्यात आलं.”

अभय पुढे म्हणाला, “हृतिक आणि कॅटरीनाला अॅक्टर्स इन ए लिडींग रोल च्या रुपात नॉमिनेट करण्यात आलं होतं. फिल्म इंडस्ट्रीतील तर्कानुसार हा एक माणूस आणि एक महिला प्रेमात पडणाऱ्या कपल्सची स्टोरी होती. असेच गुप्त आणि ओपन मार्ग आहेकत ज्यांनी लोक इंडस्ट्रीत तुमच्या विरोधात कारस्थान करतात. या प्रकरणी ही इंडस्ट्री बशर्म होती. मी या अवॉर्ड्सचा बहिष्कार केला. परंतु फरहानला यापासून काही अडचण नाहीये.”

सोबतच अभयनं या पोस्टच्या शेवटी व्यंगाच्या रुपात लिहिलं की, “फॅमीलीफेअरअवॉर्ड्स.” एवढ्या एका शब्दाच्या मदतीनं त्यानं थेट फिल्म इंडस्ट्रीवर निशाणा साधला आहे.