भाईजान सलमानच्या अंगरक्षकाने घातला भर रस्त्यात ‘राडा’ , कारच्या काचा फोडत लोकांवर केला हल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एकेकाळी सलमान खानच्या अंगरक्षकांच्या समूहात काम करणाऱ्या अंगरक्षकाने भर रस्त्यात गोंधळ घातल्याचं समोर आलं आहे. मुरादाबादमध्ये या अंगरक्षकाने भर रस्त्यात गोंधळ घालून तणावाची परिस्थिती निर्माण केली. अनिस कुरेशी असं त्याचं नाव आहे. त्याने जवळपास दीड वर्षांपूर्वी सलमानचा अंगरक्षक म्हणून काम केल्याचं समजत आहे.

जीमला जाण्यासाठी बुधवारी त्याने जास्त प्रमाणात औषधाचे सेवन केले होते. जीममध्ये जास्त वजन उचलता यावे यासाठी शारीरिक क्षमता वाढावी म्हणून त्याने औषधे घेतली. परंतु औषधांचा चुकीचा परिणाम झाल्याने त्याने रस्त्यातच धुडगूस घातला असे समोर आले आहे. गुरुवारी अनिसची परिस्थिती आणखीणच बिघडली. यानंतर त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांवर हल्ला करायला सुरुवात केली. एका लोखंडी रॉडने तर त्याने कारच्या काचाही फोडल्या.

यानंतर तेथील लोकांच्या लक्षात आले की, परिस्थिती हाताबाहेर जात आहे. लोकांनी तात्काळ पोलिसांना पाचरण केले. पोलिसांना बोलावल्यानंतर स्थानिकांनी आणि पोलिसांनी मासेमारांचं जाळं आणि दोरखंडाच्या साहाय्याने अनिसला पकडण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अनिसला रुग्णालयात दाखल केल्यानंतर समोर आलं की, अनिसने घेतलेल्या औषधांचं प्रमाण चुकल्यानेच हे घडलं. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मनोरुग्णालयात नेण्यास सांगितले. पोलिसांनीही याबाबत माहिती दिली.

एकेकाळी सलमान खानचा अंगरक्षक असणारा अनिस सध्या एका मंत्र्यांचा अंगरक्षक आहे. नुकत्याच पार पडलेल्या मि. मुरादाबाद या स्पर्धेत त्याने भाग घेतला होता. गेल्या दहा दिवसांपासून अनिस मुरादबादमध्ये आहे.

Visit : policenama.com