‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘पीएम नरेंद्र मोदी’ 

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेला नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील बायोपिक  ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. काही दिवसांपासून या चित्रपटाला अनेक अडचणी येत होत्या पण आता निवडणूक मतमोजणी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २४ मे ला प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण नागपूर येथे झाले. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉयने मुख्य भूमिका साकारली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या एक्झिटपोलविषयी विवेकने आपले मत मांडले. एक्झिटपोलमध्ये आलेल्या निकालावरून आपण समाधानी असल्याचे यावेळी म्हंटले. गेल्या साठ वर्षांपासून देशाच्या प्रगतीच्या वाटेत जे काही खड्डे खणले गेले ते खड्डे बुझवून आता त्यावर विकासाची इमारत बांधली जाणार असल्याचं म्हणत विवेकने मोदी सरकारच्या कार्यपद्धतीचं समर्थन केलं.

त्याची ही मध्यवर्ती भूमिका आणि चित्रपटाचा ट्रेलर गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत होता. जेंव्हा चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना मोदींच्या रूपात चाहत्यांसमोर आल्यावर सर्व प्रेक्षकांनी घोषणाबाजी चालू केली. यावेळी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी तो बराच आशावादी असल्याचही पाहायला मिळालं. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काहीदिवसांपूर्वीच येणार होता पण विरोधी पक्ष नेत्यांकडून आचारसंहितेदरम्यान या चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग रोखला होता. पण आता येत्या २४ तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांचा भेटली येणार आहे.