अभिनेत्रीच्या न्यूड सीनमुळे ‘या’ चित्रपटावर अश्लीलता पसरवण्याचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या बोल्ड सीनमुळे नेहमी चर्चेत असणारी साउथ इंडियन अभिनेत्री अमला पॉल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपुर्वी चित्रपट ‘अदाई’चा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलर प्रदर्शित होताच जबरदस्त चर्चेमध्ये आला होता. हा ट्रेलर चर्चेत येण्याचे कारण म्हणजे अमला पॉलचा न्यूड सीन. हा न्यूड सीन सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाला होता. या सीनमुळे हळू-हळू वाद वाढू लागला आणि आता या सीनमुळे अश्लीलता पसवण्याचा आरोप या चित्रपटावर लावला गेला आहे.

तक्रारीमध्ये चित्रपटावर अश्लीलता पसरवण्याचा आणि तमिळ संकृती खराब करण्याचा आरोप केला गेला आहे. तक्रारीनंतर चेन्नईमधील अनेथू मक्कल काची पार्टीची संस्थापिका राजेश्वरी प्रियाने सांगितले की, मी डिजीपीकडून चित्रपटाच्या मेकर्सविरोधात अॅक्शन घेण्याची मागणी केली होती कारण चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वापरण्यात येणारे न्यूड पोस्टर लहान मुलांना आकर्षित करतील. मी चित्रपटाच्या प्रमोशनच्या विरोधात आहे कारण याला प्रत्येक लोक पाहतील आणि त्यांच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

यासोबतच तिने स्पष्ट केले की, ती हा चित्रपट प्रदर्शणावर बंदी आणू शकत नाही कारण सेंसर बोर्डने या चित्रपटाला सर्टिफिकेट देऊन पास केले आहे. याआधी राजेश्वरीच्या पार्टीने अभिनेत्री अमलावर अनेक प्रकारची टिका केली होती. त्यांचे म्हणणे आहे की, अमला पैसे आणि प्रसिद्धीसाठी काहीही करु शकते आणि ती संस्कृतीचा आदर करत नाही.

या चित्रपटातील न्यूड सीनमुळे अमलाने मिडियासोबत चर्चा केली आहे. तिने सांगितले की, हा सीन करणे तिच्यासाठी खूप कठीण होते. सीनला घेऊन ती खूप नर्वस होती पण मेकर्सने खूप सपोर्ट केला. शूट करताना सेटवर फक्त १५ लोक उपस्थित होते आणि सगळे विश्वासु होते त्यामुळे ती हा सीन करु शकली. हा चित्रपट १९ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like