‘देवों के देव महादेव’मधील अ‍ॅक्ट्रेस प्रीतिका चौहान ड्रग्ज खरेदी करताना रंगेहात अरेस्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडशी संबंधीत ड्रग्ज केसमध्ये एनसीबीने मोठे यश मिळवले आहे. ‘देवों के देव महादेव’ नवाच्या टीव्ही सीरियलमुळे घराघरात ओळखली जाणारी अभिनेत्री प्रीतिका चौहानला नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने अटक केली आहे.

एनसीबीने सापळा रचला होतो आणि जेव्हा रविवारी प्रीतिका चौहान ड्रग्ज खरेदी करत होती, त्याचवेळी तिला रंगेहात अटक करण्यात आली. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने तिच्याकडून 99 ग्रॅम गांजा सुद्धा जप्त केला आहे. एजन्सीने अभिनेत्रीसह आणखी एकाला अटक केली आहे. या आरोपींना 8 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

न्यूज एजन्सी एएनआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबई झोनल युनिटच्या एका टीमने मच्छिमार, वर्सोवा येथून दोन लोकांना अटक केली आहे. त्यांच्याकडे तो 99 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांची नावे फैजल आणि प्रीतिका चौहान आहे. प्रीतिका चौहान टीव्ही अभिनेत्री आहे. दोघांना न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना 8 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

एनसीबी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधीत ड्रग्ज केसचा तपास करत आहे. तपासानुसार पुराव्यांच्या आधारावर एजन्सीने ड्रग्ज रॅकेटचा खुलासा केला आहे. एनसीबीने अजूनपर्यंत या रॅकेटशी संबंधीत 20 पेक्षा जास्त लोकांना अटक केलीे आहे. एनसीबीची टीम साध्या कपड्यात मुंबईच्या वर्सोवा भागात सापळा रचून अभिनेत्रीची वाट पहात होती. पेडलर जेव्हा अभिनेत्रीला ड्रग्ज देत होता, त्याच वेळी एजन्सीने दोघांना रंगेहात पकडले.

You might also like