भारत-पाक क्रिकेट सामन्यावर ‘या’ वादग्रस्त अभिनेत्रीने लावली ‘पैज’ ; ‘ट्विट’ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वर्ल्डकपमध्ये रंगलेल्या भारत पाक सामन्याची सर्वत्र चर्चा दिसून येत आहे. या चर्चेत बॉलिवूड देखील मागे नाहीय. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने या सामन्याविषयी ट्विट केले आहे. तिच्या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली आहे. स्वरा भास्करने भारत – पाक सामन्याविषयी आपल्या पाकिस्तानी मित्रांबरोबर पैज लावली आहे. त्याच बरोबर भारतच हा सामना जिंकेल अशी देखील ती म्हणाली आहे. भारत पाकिस्तानविषयी स्वराने केलेले हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे.

काय म्हणाली स्वरा ?

स्वराने ट्विटमध्ये तिच्या पाकिस्तानी मित्रांना टॅग करून लिहिले आहे की, माझ्या सर्व पाकिस्तानी मित्रांनो. आज कितीची पैंज ? आपण काय पैज लावू शकतो. भारत जिंकल्यावर मला काय मिळेल ? मी लिबर्टीमध्ये खरेदी आणि अनारकलीमध्ये सूट पीस घेऊ इच्छिते. तुमची इच्छा काय आहे. स्वरा भास्करचे हे ट्विट पाहून ती भारत पाक सामन्याविषयी किती उत्सुक आहे हे कळते. तिने भारताच्या विजयाचा देखील दावा केला आहे.

स्वरा भास्कर शिवाय बॉलिवूड निर्माता अशोक पंडित यांनी देखील भारत पाक सामन्याविषयी उत्सुकता दाखवली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, जो कोणी टॉस जिंकतो तो संघ सामना हरतो. पंडित यांनी अशा पद्धतीने पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. भारत पाक सामन्याविषयी चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता दिसून येत आहे. पावसाने सामन्यामध्ये काही काळ व्यत्यय आणला असला तरी सामना पुन्हा एकदा सुरु झाला आहे. भारताने पाकसमोर ३३७ धावांचे आव्हान ठेवले आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

कांदा व लसूण एकत्र खा, होतील ‘हे’ फायदे

पेस्ट कंट्रोल पेक्षा हे उपाय करा, किटक जातील पळून

संध्याकाळीहीकरू शकता व्यायाम, सकाळ एवढाच फायदेशीर

मोदींनी केला ‘शशांकासन’ चा व्हीडिओ शेयर

Loading...
You might also like