अरे देवा ! वरमाला घालताना फाटला होता आदित्य नारायणचा पायजमा ! ‘असं’ जुगाड करत श्वेतासोबत घेतले 7 फेरे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडमधील फेमस सिंगर उदित नारायण (Udit Narayan) यांचा मुलगा सिंगर आणि इंडियन आयडल 12 चा होस्ट आदित्य नारायण (Aditya Narayan) यानं आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. आदित्य वाजतगाजत लग्नबंधनात अडकला आहे. आदित्य आणि त्याची लाँग टाईम गर्लफ्रेंड अ‍ॅक्ट्रेस श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) यांनी 1 डिसेंबर रोजी लग्न केलं आहे.

आदित्य आणि श्वेता यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. दोघं खूप सुंदर आणि आनंदी दिसत आहेत. अलीकडेच त्यांची रिसेप्शन पार्टी झाली. यात अनेक सेलेब्स आले होते. लग्नानंतर खुद्द आदित्यनंच असा एक लग्नातील किस्सा शेअर केला आहे, जो तो कधीच विसरू शकणार नाही. लग्नानंतर दिलेल्या पहिल्या मुलाखतीत आदित्यनं याबाबत सांगितलं आहे.

मुलाखतीत बोलताना आदित्य म्हणाला की, लग्नात तो जेव्हा श्वेताला वरमाला घालत होता तेव्हा श्वेताच्या भावांनी तिला उचलून घेतलं होतं. यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला जेव्हा उचललं त्याचा पायजमा फाटला. त्यांनी असंही सांगितलं की, बरं झालं एका मित्राचा पायजमा त्याच्या सारखाच होता. यानंतर पुढील विधी करताना त्यानं मित्राचा पायजमा घातला.

आदित्यनं सांगितलं की, त्यानं अंधेरीत 5 बीएचके हाऊस खरेदी केलं आहे. त्याच्या पॅरेट्सच्या घराच्या तीन बिल्डिंग सोडून हा फ्लॅट आहे. 3-4 महिन्यांत तो तिकडे शिफ्ट होणार आहे.