Akshay Kumar नं लग्नाच्या 20 व्या वाढदिवसाला शेयर केलं हे खास छायाचित्रं, पत्नी ट्विंकल खन्नासाठी लिहिली प्रेमळ पोस्ट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना बॉलीवुडच्या सुंदर कपलपैकी एक आहे. ते आज रविवारी (17 जानेवारी) आपल्या लग्नाचा 20 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास निमित्ताने अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाच्या फॅन्ससह बॉलीवुडचे अनेक कलाकार त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. या दरम्यान अभिनेता अक्षय कुमारने सुद्धा पत्नी ट्विंकल खन्नाला खास पोस्ट लिहिली आहे.
अक्षय कुमार सोशल मीडियावर खुप सक्रिय असतो. तो नेहमी आपल्या फॅन्ससाठी खास छायाचित्रे आणि व्हिडिओसुद्धा शेयर करत असतो. अक्षय कुमारने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या लग्नाच्या वाढदिवशी पत्नी ट्विंकलसोबतचा आपला खास फोटो शेयर केला आहे. छायाचित्रात ट्विंकल खन्ना ब्ल्यू सूट आणि अक्षय कुमार व्हाइट शर्टमध्ये दिसत आहे.
हे छायाचित्र शेयर करत अक्षय कुमारने ट्विंकल खन्नासाठी खास पोस्टसुद्धा लिहिली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, इतक्या खात्रीशीर मी एखाद्या नात्यात राहिलो. 20 वर्ष आपली एकमेकांसोबतची, आणि आज सुद्धा तू माझे हृदय जिंकतेस. माझं हसू कधीही दूर होत नाही जेव्हा तू जवळ असते. हॅप्पी अॅन्व्हर्सरी टीना.
सोशल मीडियावर पत्नी ट्विंकल खन्नासाठी लिहिलेली ही अक्षय कुमारची पोस्ट खुप वायरल होत आहे. अभिनेता आणि ट्विंकल खन्नाच्या अनेक फॅन्सनी ही पोस्ट पसंत केली आहे. सोबतच या दोन्ही कलाकरांना कमेंट करून ते शुभेच्छा सुद्धा देत आहेत. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी 17 जानेवारी 2001 ला विवाह केला होता. लग्नच्या पूर्वी या दोघांनी मोठ्या कालावधीपर्यंत एकमेकांना डेट केले होते.
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना चित्रपटांमधून सोबत दिसले आहेत. या दोघांनी जुल्मी आणि इंटरनॅशनल खिलाडी या चित्रपटांमधून सोबत काम केले आहे. प्रेक्षकांनी अक्षय कुमार आणि ट्विंकलच्या जोडीला खुप पसंत केले होते. सध्या ट्विंकल खन्ना मोठ्या कालावधीपासून चित्रपटांपासून दूर आहे.