‘असा’ निवडला होता आलिया भट्टने IIFA अवॉर्डसाठी ड्रेस ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील उत्तम अभिनेत्रींपैकी एक असणारी आलिया भट्ट नुकतीच आयफा अवॉर्डमध्ये दिसली. यात तिचा वेगळाच अंदाज पहायला मिळाला. नुकताच आलियाने आपल्या युट्युब चॅनलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने आपली पूर्णच्या पूर्ण स्टायलिंग चाहत्यांसाठी शेअर केली आहे.

आलिया भट्टने नुकताच युट्युब चॅनल सुरु केला आहे. ज्यात ती आपल्या पर्सनल लाईफशी निगडीत काही व्हिडीओज शेअर करत असते. चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडीओत आलियाने मेकअप आर्टीस्ट आणि स्टायलिस्टचा परिचय दिला आहे. व्हिडीओत ती ड्रेस निवडताना दिसत आहे जो तिने अवॉर्ड फंक्शनमध्ये घातला होता.

आलिया मेकअप आर्टीस्ट सांगते आलिया नेहमीच आपली लिपस्टिक खात असते. यावर तिनेही कधी हे मान्य केलं होतं. चाहत्यांना सल्ला देताना आलिया म्हणते, “हेअर स्टाईल कोणत्याही लुकला चांगलं करू शकते किंवा बिघाडू शकते.”

पुढे आलिया सांगते की, आर्टीस्टसाठी मेकअपपेक्षा नो मेकअपसाठी जास्त अवघड असतं. नुकत्याच झालेल्या आयफा अवॉर्डमध्ये आलियाने पीच न्यूड कलरचा गाऊन घातला होता. मेटलिक कम नो मेकअप लुकमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती.

visit : Policenama.com