Alia Bhatt On Gangubai Kathiawadi : आलिया भट्टने ‘गंगूबाई काठियावाडी’च्या शूटबाबत सांगितली ‘ही’ गोष्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चित्रपट अभिनेत्री आलिया भट्ट सोशल मीडियावर खुप अ‍ॅक्टिव्ह असते. तिने नुकतीच अगामी चित्रपट ’गंगूबाई काठियावाड़ी’ ची शूटिंग सुरू केली आहे. कोरोना काळात हे शूट सुरू आहे. हा चित्रपट यावर्षी रिलिज होणार होता, परंतु यास पोस्टपोन करण्यात आले.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आलियाने सेटवर मोठ्या कालावधीनंतर परतल्याबाबत मत मांडले आहे. आलिया भट्टला शूटच्या अनुभवाबाबत विचारल्यावर आलियाने म्हटले की, टीमच्या लोकांसोबत पुन्हा एकदा भेटून आणि सेटवर परत आल्याने चांगले वाटत आहे. तिने हे सुद्धा सांगितले की, चित्रपट निर्मात्यांनी अनेक प्रतिबंध आणि प्रोटोकॉल तयार केले आहेत. ज्याचे पालन करावे लागते.

सोबतच आलियाने हे सुद्धा म्हटले की, ती न्यू नॉर्मलचे स्वागत करत आहे आणि स्थितीनुसार काम करत आहे. आलिया भट्टला विचारण्यात आले की, परत सेटवर आल्यानंतर भिती वाटत होती का. यावर ती म्हणाली, अगोदर मला काही शंका होत्या, परंतु सर्वांच्या प्रयत्नाने आम्ही सर्वकाही चांगले करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला जे करायचे आहे, ते करू शकणे हे एखाद्या आशीवार्दा प्रमाणे आहे.

आलिया भट्ट फिल्म आर. आर. आर. च्या शूटिंगसाठी तयार होत आहे. ती मुंबई एयरपोर्टवर दिसली होती. तिने इन्स्टाग्रामवर याबाबत लिहिले आहे की, आर. आर. आर. च्या शूटिंगसाठी जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. एस. राजमौली करत आहेत. या चित्रपटात राम चरण, ज्यूनियर एनटीआर आणि अजय देवगनची महत्वाची भूमिका आहे. आलिया भट्ट रणबीर कपूरची प्रेयसी आहे. आलिया भट्टने अनेक चित्रपटात काम केले आहे. ती बॉलीवुडच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे.