हॉस्पीटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अमिताभ बच्चननं मौन सोडलं, भडकलेले ‘बिग बी’ म्हणाले – ‘हे शोषण आहे’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे बिग अमिताभ बच्चन गेल्या मंगळवार रुग्णालयात भरती झाले होते. अनेकजण त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत होते. परंतु बिग बींना नेमकं झालं तरी काय हे अनेकांना माहितीच नाही. सध्या रुग्णालयातून घरी आले आहेत. यावर त्यांनीही आपले मौन सोडले आहे.

आपल्या ब्लॉगपोस्टमधून बिग बींनी खुलासा केला आहे. पोस्टमध्ये अमिताभ म्हणतात, “प्रोफेशनल डॉक्युमेंटेशनच्या मर्यादा कृपया तोडू नका. आजार आणि मेडिकल कंडिशन प्रत्येकाचा कॉन्फीडेन्शियल राईट आहे. हे शोषण आहे आणि असं करणं समाजिकरित्या चुकीचं आहे. आदर करत ही गोष्ट समजून घ्या. प्रत्येक गोष्ट या विक्रीच्या जगासाठी नाही. ”

आणखी एका ब्लॉगमध्ये बिग बी म्हणतात, “सर्वांना माझं प्रेम आणि सन्मान. सर्व काळजी आणि प्रार्थनेसाठी धन्यावाद.” मंगळवारी रात्री 3 वाजाता बिग बींना मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री 9 वाजता बिग बींना रुग्णालयातून घरी आणण्यात आले.

Visit : policenama.com