लग्नापूर्वी वरुणनं काही खास मित्रांनी अलिबागमध्ये दिली ‘बॅचलर पार्टी’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड अ‍ॅक्टर वरूण धवन (Varun Dhawan) आणि त्याची गर्लफ्रेड नताशा दलाल (Natasha Dalal) बी टाऊनमधील पॉप्युलर कपल्सपैकी एक आहे. आता दोघं लग्न करत आहेत. सध्या त्यांच्या या लग्नाची खूप चर्चा सुरू आहे. अलिबागमध्ये वरुण-नताशा लग्न करणार आहेत. दोघांच्या लग्नाच्या विधीला सुरुवात झाली आहे. 24 जानेवारीपर्यंत वरुण आणि नताशा यांच्या लग्नाचे विविध कार्यक्रम चालणार आहेत. कोरोनामुळं काही मोजक्याच लोकांना लग्नाचं आमंत्रण देण्यात आलं आहे. शुक्रवारी (दि 22 जानेवारी) रात्री वरुणच्या काही मंत्रांनी एका रिसॉर्टवर बॅचलर पार्टी ठेवली होती जे विवाहस्थळापासून 5 मिनिटांच्या अंतरावर होतं.

सकाळपर्यंत चालणाऱ्या पार्टीत वरुणनं मित्रांसोबत डान्स करत या पार्टीचा आनंद घेतला. यासोबत कार्यक्रम असणाऱ्या ठिकाणीही म्युझिक ऐकू येत होतं. हे म्युझिक संगीत समारंभाच्या रिहर्सलचं होतं जो शनिवारी रात्री आयोजित केला जाणार आहे.

वरुण आणि नताशा हे शालेय जीवनापासून एकमेकांना ओळखतात. गेल्या काही वर्षांपासून वरुण आणि नताशा हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. आता लवकरच या अफेअरचं रुपांतर लग्नात होणार आहे.

वरुणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो स्ट्रीट डान्सर 3 डी मध्ये झळकला आहे. नुकताच वरुण पिता डेविड धवनचा सिनेमा कुली नंबर 1 च्या रिमेकमध्येही दिसला आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सारा अभिनेत्री अली खान प्रमुख भूमिकेत होती. हा सिनेमा अ‍ॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) वर ख्रिसमस डे ला म्हणजेच 25 डिसेंबर 2020 रोजी रिलीज झाला आहे