‘भुज’चा फर्स्टलुक OUT, 14 ऑगस्टला पाकिस्तानी सैन्यावर ‘हल्लाबोल’ करताना दिसणार अजय देवगण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारत-पाकिस्तान यांच्यात 1971 मध्ये झालेल्या युद्धावर आधारित ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ हा हिंदी चित्रपट यावर्षी 14 ऑगस्टला प्रदर्शित होणार हा योगायोग मानला पाहिजे. उल्लेखनीय आहे की, 14 ऑगस्ट रोजी जेव्हा पाकिस्तानी लोक त्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत, त्याच वेळी अजय देवगण, संजय दत्त सारखे कलाकार या चित्रपटातून पाकिस्तानी सैन्यावर हल्लाबोल करणार आहे.

निर्देशक अभिषेक दुधियाने त्याच्या आगामी चित्रपट ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ चा फस्ट लुक जारी केला आहे. यामध्ये मुख्य भूमिका साकारत आहे तो म्हणजे अजय देवगण. हा एका धाडसी अधिकाराऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने भारतीय वायुसेनाची अभिमानाची टोपी घातली आहे. त्याच्या मागे भारतीय वायुसेनाचे एक विमान दिसत आहे. ज्यावर भारताचा तिरंगा झेंडा फडकत आहे.

हा चित्रपट 1971 साली झालेल्या भारत-पाक युद्धावर आधारित चित्रपट आहे. यात अजय देवगण स्कॉड्रॉन लीडर विजय कर्णिकच्या भूमिकेत दिसणार आहे. स्कॉड्रॉन लीडर विजय कर्णिक हाच एक अधिकारी आहे जो 1971 च्या युद्धाच्या वेळी गुजरातच्या भुजमध्ये पाकिस्तानांनी अंदाधुंद गोळीबार केला होता आणि तेथील सर्व एयरस्पेस उद्ध्वस्त झाले होते.

यानंतर भुज एअरबेस प्रभारी स्कॉड्रन लीडर विजय यांनी भुजच्या आसपासच्या खेड्यात राहणाऱ्या सुमारे 300 महिलांना हवाई पट्टी पुन्हा तयार करण्यासाठी राजी केले. यानंतर, भारतीय हवाई दलाच्या विमानांना भुजमध्ये सुरक्षित खाली उतरण्यास यश आले. पाकिस्तानी लोकांचा डाव असा होता की, भुजचे एअरबेस नष्ट केले तर भारतीयांकडून लढणारे युद्ध कमकुवत होईल. पण विजय कर्णिक यांनीच आपल्या बुद्धीने शत्रुंच्या प्लॅनिंगला यश मिळवू दिले नाही.

दिग्दर्शक म्हणून अभिषेक दूधियाचा हा पहिला चित्रपट आहे. पण अशा पात्रासाठी अजय देवगण हा सर्वात योग्य अभिनेता आहे. अजय देवगण याने ‘द लिजेंड ऑफ भगतसिंग’ सारख्या देशभक्तीवर आधारित चित्रपटांसाठी यापूर्वीही अनेक मोठे पुरस्कार जिंकले आहेत. तर ‘दिलजले’, ‘हिंदुस्तान की कसम’ आणि ‘मेजर साब’ यासारख्या चित्रपटांमध्ये देशाला समर्पित झालेल्या पात्रांना त्याने खूप छान पद्धतीने साकारले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/