CAA NRC Protest : नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, जावेद जाफरी सारख्या 300 प्रतिष्ठितांनी आता CAA विरोधात लिहीलं ‘खुलं’ पत्र

नवीदिल्ल्ली : वृत्तसंस्था – नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक शहा, जावेद जाफरी,गायक टीएम कृष्णा, लेखक अमिताव घोष, इतिहासकार रोमिला थापर सारख्या 300 जणांनी इंडियन कल्चरल फोरमच्या माध्यमातून एका खुल्या पत्राद्वारे सीएए आणि एनआरसी बाबत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे समर्थन केले आहे. या सर्व जणांनी सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत आम्ही देखील आहोत असे म्हंटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत आणि इतर लोकांसोबत आम्ही उभे आहोत तसेच संविधानाच्या सिद्धांतासाठी विरोध करणाऱ्या आंदोलकांसोबत असल्याचे देखील पत्राद्वारे अनेकांनी सांगितले आहे.

सीएए आणि एनआरसीच्या विरोधासाठी आता लोक खुले पणाने बोलायला लागले आहेत. खुल्या पत्रात हे देखील सांगण्यात आले आहे की, जे लोक लोकशाहीसोबत आहेत ते लोक आंदोलनकर्त्यांसोबत देखील आहेत. पत्रामध्ये जामिया मिलिया इस्लामिया आणि अलीगढ़ मुस्लिम विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांवर पोलिसांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईवर देखील टीका करण्यात आली आहे.

जगातील कोणत्याही इतर लोकशाही देशापेक्षा जास्त इंटरनेट सेवा भारतात बंद ठेवण्यात आल्याचेही आता समोर आले आहे. पोलिस हिंसाचारात शेकडो लोक जखमी झाले आहेत, ज्यामध्ये जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठ आणि अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या अनेक विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. निषेध रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये कलम 144 देखील लागू करण्यात आले आहे.

https://www.instagram.com/p/B66bC8bHEsR/?utm_source=ig_web_copy_link

याआधी अभिनेते नासिरुद्दीन शहा यांनी अभिनेते अनुपम खेर यांना जोकरची उपमा देत त्यांनी बोललेल्या गोष्टींकडे गंभीरतेने न पाहण्यास सांगितले होते. याला अनुपम खेर यांनी उत्तर देताना एक व्हिडीओ ट्विट केला होता आणि नसिरुद्दीन शहाला ‘फ्रस्ट्रेटेड’ असल्याचे देखील म्हंटले होते.