Celebrities Death 2020 : ‘ही’ यादी सांगते की, किती ‘अशुभ’ 2020 चं वर्ष !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   खूप अपेक्षांनी सुरू झालेलं साल 2020 आता खूप उदास आणि अशुभ वाटू लागलं आहे. कारण याच्या सेकंड हाफ मध्ये जाताना अनेक दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. ते कोण कोण आहेत हे जाणून घेऊयात.

1) इरफान खान-  इरफानचा अंग्रेजी मीडियम सिनेमा रिलीज झाल्यानंतर साऱ्यांना वाटलं की त्यांनी वापसी केली आहे. परंतु त्याचा आईचं निधन झाल्यानंतर लगेच 29 एप्रिल 2020 रोजी इरफाननं जगाचा निरोप घेतला.

2) ऋषी कपूर-  इरफानचं निधन झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 एप्रिल 2020 रोजी दिग्गज स्टार ऋषी कपूर यांचं निधन झालं. अखेरपर्यंत ते बॉलिवूडमध्ये सक्रिय होते.

3) वाजिद खान-  वाजिदचं निधन झालं आणि 1 जून 2020 मध्ये साजिद-वाजिद ही फेमस जोडी तुटली. वाजिद खान किडनीच्या आजारानं ग्रस्त होता. काही महिन्यांपूर्वीच त्याची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली होती. काही रिपोर्टस् त्याला कोरोनाची लागण झाल्याचंही सांगत आहेत.

4) प्रेक्षा मेहता –  क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिनं इंदोरमधील घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच(सोमवार दि 25 मे 2020) समोर आली. तिनं पॅडमॅन या सिनेमासह लाल इश्क, मेरी दुर्गा, क्राईम पेट्रोल अशा अनेक मालिकेत काम केलं होतं.

5) सेजल शर्मा-  सेजलनं 24 जानेवारी 2020 रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 27 वर्षीय सेजल हॅप्पी जी या मालिकेत दिसली होती. आत्महत्येचं काही खासगी कारण आहे असं सांगितलं जात असलं तरीही याचा तपास अद्याप सुरू आहे.

6) निम्मी-  50 आणि 60 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री निम्मी यांचं मार्चमध्ये बुधवारी (दि 25 मार्च 2020 रोजी) सायंकाळी मुंबईत निधन झालं. निम्मी 88 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. सांताक्रूझमधील एका प्रायव्हेट रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दि 26 मार्च 2020 ((गुरुवार) त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले.

7) मोहित बघेल-  बॉलिवूडचा यंग कॉमेडी अॅक्टर मोहित बघेल यानंही जगाचा निरोप घेतला आहे. मोहित 27 वर्षांचा होता जेव्हा त्याला कॅन्सर झाला होता. त्यानं होमटाऊन मथुरेत शेवटचा श्वास घेतला. निधनाच्या आदल्या रात्रीच त्याची तब्येत खराब झाली होती. यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. यानंतर त्यानं जागाला अलविदा केलं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like