‘गंगूबाई काठियावाडी’च्या शीर्षकावर भडकले काँग्रेसचे आमदार; केली नाव बदलण्याची मागणी, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  संजय लीला भन्साली यांच्या चित्रपटाशी संबंधित वाद काही नवीन नाहीत. भन्साली यांच्या भव्य आणि रंगीबिरंगी चित्रपटांवरील विवादही याचप्रामणे आहेत. ‘राम लीला’ आणि ‘पद्मावत’च्या वादानंतर आता गंगूबाई काठियावाडी या नावावरून वाद सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे.

पीटीआयच्या म्हणण्यानुसार, गंगूबाई काठियावाडी या नावाने ‘काठिवाड’ शहराचे नाव खराब होत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांनी नाव बदलण्याची मागणी केली आहे. भन्साली दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी ही मुंबईतील माफिया क्वीनच्या एका अध्यायातून एस. हुसेन जैदी यांनी लिहिलेल्या मुंबईतील रेड लाइट क्षेत्रातील कामाठीपुरा येथील गंगूबाईची ही कहानी आहे. या चित्रपटात अलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे आणि तो बऱ्यापैकी लोकप्रिय झाला आहे. अजय देवगणसुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ही कथा साठच्या दशकातील सांगितली गेली आहे.

पटेल यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला आणि ते म्हणाले, कामाठीपुरा परिसर आता खूप बदलला आहे. आता पूर्वीसारखा नाही. येथे बरेच व्यवसाय आले आहेत. या चित्रपटाचे शीर्षक शहराच्या नावावर कलंकित आहेत. म्हणून चित्रपटाचे नाव बदलले पाहिजे. अमीन पटेल हे दक्षिण मुंबईतील विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. सन २०१८ मध्ये संजय लीला भन्साली यांच्या ‘पद्मावत’ या चित्रपटाने कित्येक दिवस खळबळ उडवली होती. या चित्रपटात दीपिका पदुकोणने चित्तोडची राणी पद्मावतीची भूमिका साकारली होती. रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत होता. काही संघटनांनी चित्रपटाला विरोध केला होता, कारण त्यांनी पद्मावती आणि खिलजी यांच्यातील आक्षेपार्ह दृश्यांचा चित्रपटात समावेश असल्याचा संशय होता. हा गोंधळ कित्येक महिने सुरू राहिला, त्यामुळे त्यांना चित्रपट रिलीज करण्याची तारीख बदलावी लागली होती.

अखेर पद्मावतीचे नाव बदलून ‘पद्मावत’ करण्यात आले, ते मलिक मोहम्मद जयसीच्या महाकाव्याचे नाव आहे. ज्यात राणी पद्मावतीची जौहर ही घटना असल्याचे म्हटले जाते. यापूर्वी भन्साली यांच्या राम लीला चित्रपटाच्या टायटलला विरोध होता, रिलीज होण्यापूर्वी नाव बदलून गाेलियों की रासलीला राम लीला करण्यात आले.