‘बिपाशा बसु-रोनाल्डो’च्या लिंकअपचे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल ! लोक विचारतायेत ‘हे’ प्रश्न

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसु आणि फुलबॉल प्लेअर क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्या लिंकअपची 2007 मध्ये खूप चर्चा झाली. त्याकाळी क्रिस्टियानो रोनाल्डो आणि बिपाशा बसु यांचं करिअर सुरुवातीच्या टप्प्यात होतं. दोघंही आपल्या करिअरमध्ये पुढे जात होते.

याच काळात दोघांचे काही फोटो समोर येताना दिसले. यानंतर त्यांच्या लिंकअपच्या चर्चा सुरू झाल्या. फोटोंमध्ये दोघंही एकमेकांना किस करताना दिसत होते. यानंतरच दोघांच्या अफेअरच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या.

क्रिस्टियानो रोनाल्डो आणि बिपाशा बसु यांचे हेच थ्रोबॅक फोटो सध्या सोशलवर चर्चेत असून व्हायरल होताना दिसत आहेत. हे तेच फोटो आहेत ज्यामुळं बिपाशा आणि रोनाल्डो 2007 साली चर्चेत आले होते. त्यावेळी या फोटोंमुळं दोघंही नाखुश होते. दोघांनीही त्या वर्षी एका समारंभासाठी लिस्बनच्या लूज स्टेडियमचा दौरा केला होता. हा समारंभ जगातील 7 आश्चर्यांची नावं ठेवण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.

https://twitter.com/mitali_xoxo/status/1285993495144980480

बिपाशा आणि रोनाल्डो यांचे फोटो आता पुन्हा एकदा सोशलवर व्हायरल होत आहेत. अनेक युजर प्रश्न करत आहेत की, रोनाल्डो आणि बिपाशा यांच्यात काही होतं का ? अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

https://twitter.com/urbannaxal/status/1286008511919321090

बिपाशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच बिपाशा बॉलिवूडमध्ये वापसी करण्याऐवजी बंगाली सिनेमात एन्ट्री करण्याचा प्लॅन करत आहे. 2009 साली बिपाशानं बंगाली सिनेमा शोब चरित्रो काल्पोनिक मध्ये काम केलं होतं. हा तिचा आतापर्यंतचा एकमेव बंगाली सिनेमा होता. या सिनेमातील तिच्या अॅक्टींगची खूप स्तुती झाली होती.