अभिनेता धर्मेंद्र सोशल मीडियावर ‘ऍक्टिव्ह’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हिंदी चित्रपटातील लीजेंट अभिनेता म्हणून धर्मेंद्रची ओळख आहे. धर्मेंद्र सोशल मीडियावर आल्या पासून खूपच सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसोबत आणि फॉलोअर्स सोबत नेहमी बोलत असतात आणि आपले जुने फोटो शेअर करत असतात. अलीकडेच धर्मेंद्रनी एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ते खूप वेगळ्या लूक मध्ये दिसतात. या फोटो सोबत धर्मेंद्रने खुप मजेदार कॅप्शन लिहिले आहे, ज्यावर त्यांच्या चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

एका चित्रपटा दरम्यान काढलेला हा फोटो आहे. या फोटो मध्ये धर्मेंद्रने दाडी, मिशी लावली असून खांद्यावर बंदूक घेऊन बसलेले आहेत. यावर धर्मेंद्रने विचारले आहे की, “फोटो मध्ये माझ्या एक्सप्रेशन नुसार काय कॅप्शन लिहिला पाहिजे………. मी त्यांना नाही सोडणार ……… एक्सप्रेशन!!!”.

आता धर्मेंद्र ने ८० गाठली असून चित्रपटातून त्यांनी आता विश्रांती घेतली आहे. ते आपल्या मुंबई येथील फार्म हाउस येथे जास्त वेळ घालवत असतात. धर्मेंद्र स्वतः ला शेतकऱ्याचा मुलगा मानतात आणि त्यांना शेतात वेळ घालवायला खूप आवडतो. काही दिवसाआधी ही त्यांनी एक फोटो शेअर केला होता. या फोटोच्या आठवणीत ते म्हणाले, “हा परिसर माझ्या अगदी जवळचा आहे….. मी खूप मिस करत आहे या जागेला……. सर्व काही असून ही मी नसल्या सारखा आहे…… कारण हा परिसर माझ्या पासून दूर आहे…… “.

२०१० मध्ये धर्मेंद्र ‘यमला पगला दीवाना फिर से’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. ज्यात त्यांच्यासोबत त्यांच्या दोन्ही मुलांनी स्क्रीन स्पेस शेअर केला होता.

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा

भटक्या विमुक्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा !

धक्कदायक : बौद्धांना मदत केल्यास १०हजार रु. दंड ठोठवणार, गावात दवंडी देत जातीयवाद्यांनी टाकला बहिष्कार

ग्रामीण भागातील शेतकरी, दलित, अदिवासी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा- दिनकर पावरा