सावत्र वडिलांसोबतच्या नात्यावर पहिल्यांदा बोलली दिया मिर्झा, ‘या’ गोष्टीवर झाली खूपच दु:खी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार दिया मिर्झानं अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटावर आणि आई-वडिलांच्या घटस्फोटावरही भाष्य केलं आहे. तिनं तिला आलेल्या अनेक अडणचणींबद्दल सांगितलं आहे. तिनं पहिल्यांदाच आपल्या सावत्र वडिलांबद्दलही भाष्य केलं आहे.

एका साईटला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिया मिर्झा म्हणाली, “एक मुलगी म्हणून आई-वडिलांनी वेगळं होण्याच्या प्रक्रियेत कोणत्या संघर्षांचा सामना केला आहे हे सगळं मला आठवत आहे. त्यांना एकमेकांची काळजी होती. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. परंतु एकत्र राहणं अवघड होतं. कारण त्यांना आयुष्याकडून काही वेगळ्या अपेक्षा होत्या.”

आपल्या सावत्र वडिलांबद्दल बोलताना दिया म्हणाली, “माझे सावत्र वडिल एक चांगले माणूस होते. मला त्यांना वडिल म्हणून स्विकार करायला वेळ लागला. त्यांनी मोठ्या खुबीनं मला त्यांची मैत्रीण बनवलं. 18 वर्षांची असताना मी तेव्हा सर्वात जास्त दु:खी झाले होते जेव्हा मला त्यांची केअर सोडून हैद्राबादला जावं लागलं होतं. मला त्यांना स्टेपफादर म्हणायला अजिबात आवडत नाही. त्यांनी मला आयुष्यातील अनेक लहान लहान गोष्टींची शिकवण दिली आहे” असं ती म्हणाली.

इमोशनल होत दिया म्हणाली, “मी माझ्या बायोलॉजिकल वडिलांना 9 वर्षांची असताना गमावलं होतं. मी 23 वर्षांची असताना माझ्या स्टेपफादरचा मृत्यू झाला होता. दोन पती गमावल्यानंतरही माझ्या आईनं स्वत:ला कधी कोसळू दिलं नाही. माझ्या आयुष्यातील सर्वात स्ट्रँग महिला माझी आई आहे.”