‘खिलाडी’ अक्षय कुमारची सासू डिंपल कपाडियाचा ‘हा’ फोटो पाहून लागेल ‘झटका’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अक्षय कुमारची सासू आणि वेटरन अॅक्ट्रेस डिंपल कपाडिया हॉलिवूडमध्ये काम करत आहे. ते देखील क्रिस्टोफर नोलान सारख्या टॅलेंटेड आणि प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत. सिनेमात डिंपलचा वेगळाच अंदाज दिसणार आहे. एक फोटो समोर आला आहे. ज्यात याची झलक दिसत आहे. सिनेमाच्या सेटवरील फोटो लीक झाला आहे. या फोटोत डिंपल नोलान सोबत दिसत आहे.

या फोटोत डिंपलचे केस लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. या सिनेमाचं नाव आहे टेनेट(TENET). डिंपल नोलानसोबत चर्चा करताना दिसत आहे. डिंपलचा हा काही पहिलाच इंग्रजी सिनेमा नाही. तिने 2002 साली लीलामध्ये काम केले आहे. टेनेट(TENET) या सिनेमात डिंपलव्यतिरीक्त आरोन टेलर जॉनसन, केनेथ ब्रेनेग, क्लीमेंस पोइसी, मलायका केन, जॉन डेविड वॉशिंग्टन, एलिजाबेथ डेबेकी आणि रॉबर्ट पेटिंसन प्रमुख भूमिकेत आहेत. पेटिंसनला भरतीय प्रेक्षक ट्वायलाईट सीरीजमुळे ओळखतात.

https://twitter.com/Ibabysky/status/1155074743516585984

TENET या सिनेमाच्या विषयाबाबत काही माहिती समोर आलेली नाही. परंतु असं म्हटलं जात आहे की, हा सिनेमा नोलानच्या ऑस्कर नॉमिनेटेड वॉर ड्रामा डंकर्कचा फॉलोअप आहे. या सिनेमासाठी नोलान बेस्ट डायरेक्टर म्हणून नॉमिनेट झाला होता. अशी माहिती समोर आली आहे की, TENETची काही शुटींग सप्टेंबरमध्ये मुंबईत होणार आहे.

डिंपलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर सध्या ती हॉलिवूडमध्ये काम करत आहे. बॉलिवूडबद्दल बोलायचे झाले तर 62 वर्षीय डिंपल निवडक सिनेमातच काम करत आहे. 2015 मध्ये ती वेलकम बॅकमध्ये दिसली होती. पुढील वर्षी ती आयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त