सेलिब्रिंटींच्या घरावरील छापेमारीवर CM ठाकरे म्हणाले, ‘मोदी सरकारविरोधात बोलल्याचा परिणाम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   आयकर विभागाने बॉलिवूडचे दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू आणि मधू मनटेना यांच्या घरावर छापेमारीची कारवाई केली. मधू मनटेना यांची टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी Kwaan च्या कार्यालयात आयकर विभागाचे अधिकारी पोहोचले आहेत. ही छापेमारी ‘फँटम’ फिल्मशी संबंधित टॅक्सचोरीच्या प्रकरणातून झाली आहे. त्यावरून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

या छापेमारी प्रकरणावरून आयकर विभागाच्या सूत्रांनी सांगितले, की टॅक्स चोरी प्रकरणात फँटम फिल्मसंबंधी लोकांवर आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. यामध्ये अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि इतर काही जणांचा समावेश आहे. यातील काही लोकांचा फँटम फिल्मसंबंधित टॅक्स चोरीचा संबंध शोधला जात आहे. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मोदी सरकारविरोधात या सर्वांनी भाष्य केले होते. त्यामुळेच ही कारवाई केली जात आहे. त्याचाच हा परिणाम आहे.

सरकारची बदल्याची भावना

अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्याविरोधात आयकर विभागाने छापेमारीची कारवाई केली आहे, ती एक बदल्याच्या भावनेतून केली आहे, असे काँग्रेस नेते आणि कॅबिनेटमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. तसेच शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विट करत सांगितले, की आम्हाला आशा आहे, की आयकर विभाग लवकरच बंधपत्रित गुलामाच्या स्थितीतून बाहेर येईल. अशी आशा ईडी आणि सीबीआयकडूनही आहे.