अभिनेत्री दिशा पटानीने लॉन्च केला आपला ‘YouTube’ चॅनल (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या चाहत्यांसाठी मोठे सरप्राईज घेऊन आली आहे. ‘बागी 2’ फेम अभिनेत्री दिशा पटानीने तिच्या चाहत्यांसाठी एक यूट्यूब चॅनल लॉन्च केले असून या यूट्यूब चॅनलवर चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याची संधी मिळणार आहे. या पहिल्या व्हिडिओमध्ये दिशा पटानी लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक आणि तिचा रॅम्प वॉकचा कसा अनुभवला आहे याबद्दल आपले अनुभव सांगत आहेत. अशा प्रकारे दिशा पटानीने तिच्या चाहत्यांसोबत संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे.

https://youtu.be/wELVWmJfPJA

दिशा पटानी हीने तिच्या युट्यूबची माहिती इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिली आहे. यात दिशा पटानी हीने लिहिले आहे की, ‘मी तुमच्यासोबत पहिला यूट्यूब व्हिडिओ शेअर करण्यास उत्सुक आहे. आशा आहे की, मला जितका आनंद झाला, तितकाच तुम्हाला ही झाला असेल. हे संपूर्णपणे मी स्वतःच शूट केले गेले आहे. थोडासा कच्चापणा आहे पण मी स्वत: ला दर्शविण्याचा प्रयत्न करीत आहे … ‘अशाप्रकारे दिशा पटानीने तिचे यूट्यूब चॅनेल अत्यंत शानदार मार्गाने सुरू केले आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी शेवटी सलमान खानसोबत ‘भारत’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. ‘भारत’ मधील दिशा पटानीच्या भूमिकेनेही प्रेक्षकांची मने जिंकली. आता दिशा लवकरच ‘मलंग’ चित्रपटातून चाहत्यांची मने जिंकणार आहे. या चित्रपटात दिशासोबत आदित्य रॉय कपूरसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि कुणालसुद्धा आहेत.

 

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या