गौहर खाननं घातला स्टायलिश मेटॅलिक ड्रेस ! किंमत वाचून अवाक् व्हाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्ट्रेस आणि बिग बॉस 7 ची विनर गौहर खान (Gauahar Khan) अलीकडेच बिग बॉस 14 (Bigg Boss 14) मध्ये सीनियर म्हणून दिसली होती. गेल्या अनेक दिवसांपासून ती तिच्या खासगी लाईफमुळं चर्चेत येत होती. सोशलवर कायमच सक्रीय असणारी गौहर आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं कायमच अटेंशन घेत असते. पुन्हा एकदा आपल्या काही फोटोंमुळं ती चर्चेत आली आहे. तिच्या ड्रेसच्या किंमतीचीही चर्चा होताना दिसत आहे.

गौहरनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात गौहर मेटॅलिक कोटसूटमध्ये दिसत आहे. तिनं यासोबत ब्लॅक क्रॉप टॉपही घातला आहे. ब्लॅक हील्स घालत तिनं आपला लुक कंप्लीट केला आहे.

एका रिपोर्टनुसार, गौहरनं लाँच नाईटला हा ड्रेस घातला होता. या रिपोर्टमध्ये या आउटफिटची किंमतही सांगण्यात आली आहे. गौहरच्या या स्लिमफिट मेटॅलिक जॅकेट आणि लुज पँट ची किंमत 23000 रुपये सांगितली जात आहे.

या लुकमध्ये गौहर खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिनं ज्वेलरीही खूप कमी घातली आहे. गौहर खूपच सुंदर दिसत आहे.

गौहरचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि लुकचं कौतुक केलं आहे.