गौहर खाननं चाहत्यांना दाखवली एंगेजमेंट रिंग ! म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार आणि बिग बॉस 7 ची विनर गौहर खान (Gauahar Khan) अलीकडेच बिग बॉस 14 (Bigg Boss 14) मध्ये सीनियर म्हणून दिसली होती. सध्या ती तिच्या खासगी लाईफमुळं चर्चेत आली आहे. गौहर खाननं म्युझिक कंपोजर इस्माइल दरबार (Ismail Darbar) चा मुलगा जैद दरबार (Zaid Darbar) सोबत आपलं नातं पब्लिक केलं आहे. लवकरच ती जैद सोबत लग्न करणार आहे. अलीकडेच गौहरनं तिच्या एंगेजमेंट रिंगचा फोटो सोशलवर शेअर केला आहे.

गौहरनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती तिची एंगेजमेंट रिंग फ्लाँट करताना दिसत आहे. एका फोटोत फक्त तिचा हात आणि बोटामधील रिंग दिसत आहे.

गौहरनं शेअर केलेल्या या फोटोंवर तिचा मंगेतर जैद दरबार यानंही कमेंट केली आहे. आपल्या कमेंटमध्ये त्यानं लिहिलं की, … आणि तिनं होकार दिला.

गौहरचे हे फोटो चाहत्यांनाही खूप आवडले आहेत. गौहरच्या चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीदेखील यावर कमेंट करत गौहरला शुभेच्छा दिल्या आहेत.

गौहरचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांना तिची रिंगही खूप आवडली आहे. अनेकांनी तिच्या लुकसोबतच या रिंगचंदेखील कौतुक केलं आहे.