‘सुपरहिट’ सिनेमा ‘Ghajini’चा सीक्वल येणार ! ‘हा’ अभिनेता प्रमुख भूमिकेत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 2008 साली आलेल्या आमिर खानच्या गजनी सिनेमाचा सिक्वल येत आहे अशी चर्चा आहे. सिनेमाच्या हिरोबद्दलही बोललं जात आहे. तब्बल 12 वर्षांनंतर आता गजनीचा सीक्वल गजनी 2 येणार आहे अशी माहिती समजल्यानंतर चाहतेही खुश आहे. रिलायन्स एंटरटेंमेंटनं गजनीबद्दल ट्विट केल्यानंतर गजनी 2 बद्दल होणाऱ्या चर्चांनी जोर धरला आहे.

रिलायंस एंटरटेंमेंटनं ट्विट करत एक फोटो शेअर केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “हा दोष गजनीला द्या.” जो फोटो ट्विट केलं आहे त्यात लिहिलं आहे की, “ही पोस्ट गजनीबद्दल होती परंतु आम्ही विसरलो की आम्हाला काय बनवायचं होतं ते.” लोक या पोस्टला आमिर खानचा सिनेमा गजनीचा सिक्वल म्हणजेच गजनी 2 मानत आहेत.

खास बात अशी की ही पोस्ट शेअर करताना रिलायन्स एंटरटेंमेंटनं या पोस्टमध्ये आमिर खानलाही टॅग केलं आहे. गजनीमध्ये आमिर खाननंच प्रमुख भूमिका साकारली होती. आता गजनी 2 मध्येही आमिर खान दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, गजनी 2 ची घोषणा आमिर खान आपल्या 55 व्या वाढदिवशी करू शकतो. आमिर खानचाा वाढदिवस 14 मार्च रोजी आहे. आता या पोसटमध्ये किती तथ्य आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.