#Birthday SPL : ‘या’ स्टार्ससोबत चर्चेत राहिली करिश्मा कपूर, एकासाठी तर वडिलांनीच पाठवलं होतं ‘स्थळ’, ‘तो’ अभिनेता आजही अविवाहित !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार करिश्मा कपूर आज (दि- 25 जून रोजी) 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. 90 च्या दशकात करिश्मा टॉप अॅक्ट्रेस पैकी एक आणि खूप फेमस होती. करिश्माचा जन्म 25 जून 1974 रोजी मुंबईत झाला होता. करिश्मा आपल्या पर्सनला लाईफमुळं कायमच चर्चेत राहिली आहे. आज आपण तिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. तिचं नाव कोणाकोणासबत जोडलं गेलं आहे याची माहिती घेऊयात.

1) अजय देवगण – करिश्मानं 1991 साली प्रेम कैदी सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात तिनं अजयसोबत काम केलं. सर्वात आधी तिचं नाव अजयसोबत जोडलं गेलं. नंतरही दोघांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलं. दोघांच्या नात्याची खूप चर्चा झाली. असं सांगितलं जात आहे की, याच काळात दोघं जवळ आले. परंतु हे नातं जास्त दिवस टिकलं नाही. नंतर अजयच्या आयुष्यात काजोलची एन्ट्री झाली.

2) अक्षय खन्ना – अजयनंतर करिश्माचं नाव अक्षय खन्नासोबत जोडलं गेलं. दोघांनी एका मासिकाच्या कव्हरसाठी फोटोशुट केलं होतं. यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती. एका इंग्रजी वृत्तानुसार, करिश्माचे वडिल रणधीर कपूर यांनी करिश्माचं स्थळ अक्षय खन्नासाठी पाठवलं होतं. परंतु तिच्या करिअरचा विचार करून आई बबीता कपूरनं या नात्यासाठी मनाई केली.

3) अभिषेक बच्चन – अक्षयनंतर करिश्माचं नाव अभिषेक बच्चनसोबत जोडलं गेलं. अभिषेक आणि करिश्मा कपूर यांचा साखरपुडा झाला होता. हे साल होतं 2002. करिश्मा बच्चन कुटुंबियांची सून होणार होती. दोन्ही कुटुंब आनंदात होते. 2003 मध्ये हा साखरपुडा मोडला.

4) संजय कपूर – अभिषेकसोबतचा साखरपुडा मोडल्यानंतर पुन्हा एकदा करिश्माच्या आयुष्यात प्रेमानं एन्ट्री केली. 29 सप्टेंबर 2003 मध्ये करिश्मानं संजय कपूरसोबत लग्न केलं. या लग्नाची खूप चर्चा झाल होती. या दोघांना मुलं आहेत. मुलीचं नाव समाइरा आणि मुलाचं नाव किआन आहे. 2014 मध्ये दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. 2016 मध्ये दोघेही वेगळे झाले.

5) संदीप तोषनीवाल – अशीही चर्चा आहे की, करिश्मा कपूर सध्या तिचा कथित प्रियकर बिजनेसमन संदीप तोषनीवालसोबत नात्यात आहे. दोघांच्या नात्याबद्दल खूप बोललं जात आहे.

करिश्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिनं डिजिटल डेब्यू केला आहे. अल्ट बालाजीच्या मेंटलहुड या सीरिजमध्ये करिश्मानं काम केलं आहे. तिच्या कामाचंही खूप कौतुक होताना दिसलं. या वेब सीरिजमधून तिनं दीर्घकाळानंतर अॅक्टींगमध्ये कमबॅक केलं आहे.