Weekend Plan : OTT वर फक्त 15 तासांत पाहू शकता ‘हे’ 7 अंडररेटेड सिनेमे ! पाहा ट्रेलर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नेटफ्लिक्स (Netflix) वर असे काही सिनेमे आहेत, ज्यांना अंडररेटेड समजून प्रेक्षक पाहण्याचं टाळत आहेत. या सिनेमांची खासियत अशी की, हे सिनेमे पाहून तुम्ही बोर होणार नाहीत. जर तुम्ही एका दिवसानंतर हे सिनेमे पाहिले तर तुम्हाला 15 तास लागतील. म्हणजेच हे सिनेमे तुम्हाला कमी वेळात जास्त मनोरंजन देतील. अशाच 7 सिनेमांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

1) दो पैसे की, धूप चार आने की बारीश – दीप्ती नवल डायरेक्टेड या सिनेमा मनीषा कोईराला आणि रजित कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. देहविक्री करणाऱ्या महिलेच्या आयुष्यावर ही कहाणी आहे. यात तिची भेट एका समलिंगी लेखकाशी होते.

2) सूडानी फ्रॉम नायजिरिया – जकारिया मोहम्मद डायरेक्टेड हा एक मल्याळम सिनेमा होता. 2018 मध्ये मल्याळम भाषेत याला बेस्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. युवा नायजिरीयन अभिनेता सॅम्युअल एबियोला यानं यात प्रमुख भूमिका साकारली होती. स्पोर्ट्सवर आधारीत हा सिनेमा आहे.

3) हमिद – एका 8 वर्षांच्या मुलाची स्टोरी आहे. जो आपल्या वडिलांच्या शोधात आहे. एजाज खाननं सिनेमाचं डायरेक्शन केलं आहे. 2019 साली हा सिनेमा रिलीज झाला होता.

4) तिथी – 2016 साली रिलीज झालेल्या या सिनेमाला कन्नडमध्ये बेस्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. राम रेड्डीनं हा सिनेमा डायरेक्ट केला होता. तीन पिढ्यांच्या आजूबाजूला सिनेमाची कथा फिरते.

5) रोड टू संगम – या सिनेमात परेश रावल यांचा अभिनय कौतुक करण्यासारखा आहे. प्रयागराजमध्ये शूट झालेल्या या सिनेमाची स्टोरी ही एका कार मेकॅनिकवर आधारित आहे. अमित रायनं सिनेमाचं डायरेक्शन केलं आहे.

6) उमरीका – या सिनेमाची स्टोरी अशा तरुणाची आहे, जो आपल्या हरवलेल्या भावाचा शोध घेत असतो. या सिनेमात प्रतीक बब्बर, राजेश तैलांग आणि आदिल हुसैन असे दिग्गज कलाकार दिसत आहेत.

7) हरिश्चंद्राची फॅक्टरी – या सिनेमाला भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आलं होतं. भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे.

इथं जरी आम्ही 7 सिनेमांचीच यादी सांगितली असली तरी, इतरही अनेक असे सिनेमे आहेत जे अंडररेटेड आहेत, परंतु पाहण्यासारखे आहेत आणि जे पाहताना तुम्हाला बोर होणार नाही. तुमचं चागंल्या प्रकारे मनोरंजन होईल.

You might also like