सोशलवर #Housefull4Review ट्रेंडिंग ! सिनेमा पाहून भडकले लोक, म्हणाले… (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अक्षय कुमारचा हाऊसफुल 4 हा सिनेमा नकुताच रिलीज झाला आहे. सध्या या सिनेमाची खूप चर्चा सुरू आहे. कारण अनेक लोक हा सिनेमा पाहून निराश झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सिनेमा पाहून अनेकांनी रिव्ह्यु दिला आहे. यात निगेटीव्ह रिव्ह्युचे प्रमाण जास्त आहे. अनेकांनी सिनेमा पाहिल्यानंतर राग व्यक्त केला आहे. सोशलवर अनेक रिव्ह्यु चर्चेत आहेत.

#Housefull4Review हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंड करताना दिसत आहे. एका युजरने म्हटले आहे की, “मला माझे पैसे परत हवे आहेत.” एकाने म्हटलंय, “हा सिनेमात पकाऊ आहे. यातील कॉमडीही बकवास आहे. फर्स्ट हाफ खूप इरिटेटिंग आहे. हा सिनेमा पाहणं हा सगळ्यात मोठा अभिशाप आहे. पब्लिकला हा सिनेमा पाहिल्यानंतर मोतीबिंदूचं ऑपरेशन करावं लागणार आहे.”

काहींनी तर वाईट शब्दातही कमेंट केली आहे. काहींना हा सिनेमा आवडला आहे. सिनेमाच्या ट्रेलरला लोकांची मोठी पसंती मिळाली होती. हाऊसफुल 4 हा मल्टीस्टारर सिनेमा असून 80 कोटींचं बजेट असलेला हा सिनेमा आहे. या सिनेमात अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, कृति सेनन, कृति खरबंदा आणि चंकी पांडे प्रमुख भूमिकेत आहेत.

https://twitter.com/Shakiil_Tushar/status/1187737228153380865