Video : हॉस्पिटलमध्ये हृतिक रोशन सोबत गेटकीपरनं केलं गैरवर्तन ! अभिनेत्यानं झापलं

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूड स्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) चा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असल्याचं दिसत आहे. हृतिक त्याची दोन्ही मुलं रिदान आणि रिहान यांना घेऊन एका हॉस्पिटलमध्ये गेला होता. जेव्हा हॉस्पिटलच्या आत जाऊ लागला तेव्हा गेटवर त्याला अडवण्यात आलं. हृतिकनं जेव्हा त्याला आत जाण्याबद्दल सांगितलं तेव्हा त्यानं त्याला आत जाण्यापासून अडवलं आणि त्याच्यासोबत गैरवर्तनही केलं. यानंतर हृतिकला राग आला आणि तो त्याला फटकारू लागला.

यानंतर हृतिक त्याच्या मुलांना घेऊन दुसऱ्या दरवाजानं आत गेला. व्हिडीओत दिसत आहे की, तो रागानं गेटकीपरला म्हणाला, अरे मग असं सांगा ना. सध्या त्याच्या या व्हिडीओची खूप चर्चा होताना दिसत आहे. हृतिकचा हा व्हिडीओ एंडोस्कोपी सेंटरचा आहे. काही कामानं तो तिथं गेला होता.

हृतिकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे. अनेक चाहते त्याच्या रागावण्याचं कारणही विचारत आहेत. हृतिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटचा वॉर या सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफ प्रमुख भूमिकेत होता. आता लवकरच तो फायटर सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात दीपिका पादुकोण झळकणार आहे.

सिद्धार्थ आनंद हा सिनेमा डायरेक्ट करत आहेत. इतकंच नाही तर तो निर्माता मधु मेंटाना चा ड्रीम प्रोजेक्ट रामायण मध्येही काम करताना दिसणार आहे. या सिनेमात दीपिका पादुकोण लिड रोलमध्ये असणार आहे. हा एक बिग बजेट सिनेमा आहे. यासाठी मधु 300 कोटी खर्च करणार आहे. नितीश तिवारी हा सिनेमा डायरेक्ट करणार आहेत. नितीश यांनी याआधी आमिर खानचा दंगल आणि सुशांत सिंह राजपूत व श्रद्धा कपूर स्टारर छिछोरे हे सिनेमे डायरेक्ट केले आहेत.