आमीर खानची लाडकी इरा फिटनेस कोचला करतेय डेट ! समोर आले ‘हे’ Photos

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार आमीर खान (Aamir Khan) ची लाडकी लेक इरा खान (Ira Khan) नेहमीच आपल्या फोटोंमुळे चर्चेचा हिस्सा बनताना दिसत असते. लाईमलाईटपासून दूर असणारी इरा आपला वेळ आपले मित्र, कुटुंबीय किंवा अशा कामात घालवते जे केल्यानं तिला आनंद मिळेल. इरा जवळपास रोज म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की आपल्या फोटोंमुळे चर्चेत येत असते. सध्या इरा आपल्या खासगी लाईफमुळं चर्चेत आली आहे. अशी माहिती समोर आली आहे की, इरा सध्या तिचा फिटनेस कोच नूपुर शिखर (Nupur Shikhare) ला डेट करत आहे. नूपुरनं सोशलवर एक पोस्ट शेअर केली आहे. चाहते याला हिट समजत आहेत.

गेल्या वर्षी इरा आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड मिशल कृपलानी यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओज सोशलवर व्हायरल झाले होते. परंतु नंतर दोघांचं ब्रेकअप झालं. आता नूपुर सोबत तिचे फोटो पुन्हा इशारा करत आहेत की, तिनं पुन्हा तिचं हृदय दिलं आहे.

इरा खान आणि फिटनेस कोच नूपुर शिखर याच्या नात्याबद्दल असं बोललं जात आहे की, लॉकडाउनच्या काळात दोघं एकमेकांच्या जवळ आले. नूपुरनं काही फोटो शेअर करत लिहिलं की, कारण आम्हाला दोघांना तयार व्हायल खूप आवडतं आणि स्माईल करायला पण. यावर नूपुरनं लिहिलं होतं की, होय ही गोष्ट आम्हा दोघांसह मान्य आहे.

एका रिपोर्टनुसार इरा आणि नूपुर लॉकडाउन काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. अलीकडेच इरा आणि नूपुर हे व्हॅकेशनसाठी महाबळेश्वर, खान फार्महाउसवर गेले होते. असंही म्हटलं जात आहे की, दोघंही नात्याबद्दल एकदम सीरियस आहेत. ते एकमेकांच्या आईलाही भेटले आहेत.

अद्याप यावर आमीर खानची काहीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. इराची आई रीना दत्त हिनंही यावर भाष्य केलेलं नाही. परंतु नूपुरच्या आईच्या पोस्टवर इरा अॅक्टिव्ह होऊन कमेंट करत असते.

इराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिनं डायरेक्शनमध्ये पदार्पण केलं आहे. इरानं ‘युरीपाईड्स मेडिया’ (‘Euripides Medea’) हे नाटक डायरेक्ट केलं आहे. अशी माहिती होती की, या नाटकातून सिक्सर किंग युवराजची पत्नी हेजल किच ही अभिनय क्षेत्रात कमबॅक करणार होती.

You might also like