Video : अभिनेत्री कंगना पुर्वी ‘या’ दिग्गज अभिनेत्यांनी ‘सामना’ केला मिडीया ‘बॅन’चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जजमेंटल है क्या या सिनेमातील वखरा स्वॅग या गाण्याच्या लाँचिंग सोहळ्यादरम्यान पत्रकारासोबत झालेल्या भांडणानंतर कंगना रणौतला मीडिया बॅनचा सामना करावा लागू शकतो. आता पत्रकारांचा समूह या गोष्टीची मागणी करत आहे की, कंगना रणौत आणि या सिनेमाची निर्माती एकता कपूर यांनी माफी मागावी. असे केले नाही तर कंगनाच्या सिनेमावर बहिष्कार टाकला जाईल शिवाय तिला मीडिया बॅनचाही सामना करावा लागेल असे म्हटले आहे.

कंगना ही पहिलीच नाही
मीडियाच्या अशा वागण्याचा सामना करणारी कंगना ही काही पहिलीच बॉलिवूड स्टार नाही. ८० च्या दशकात अमिताभ बच्चन आणि ९० च्या दशकात सलमान खान हेदेखील असे मीडिया बॅनचे शिकार झाले आहेत. यासाठी त्यांना मीडियासोबत जुळवून घ्यावं लागलं होतं.

अमिताभ बच्चन-
अमिताभ बच्चन यांनी सिनेमाच्या सेटवर फोटो पत्रकारांना येण्यास बंदी घातली होती. काही फोटोग्राफर्ससोबत वाद झाल्यानंतर फोटो पत्रकारांनी त्यांना बॅन केले होते. अमिताभ बच्चन यांनी यानंतर आपले फोटो काढू देणं बंद केलं आणि सर्व फोटो पत्रकारांना बॅन केलं होतं. यानंतर काही निर्मात्यांच्या आणि पत्रकारांच्या विनंती नंतर हा बॅन हटवण्यात आला. त्यानंतर मीडियानेही त्यांचं स्वागत केलं होतं.

सलमान खान –
१९९८ ते २००० पर्यंतचा काळ सलमान खान साठी खूप वाईट काळ होता. जोधपूर कोर्टातून बाहेर पडताना सलमान खान अचानक मीडियावर भडकला होता. यानंतर पत्रकारांच्या एका समूहाने त्याच्या कव्हरेजवर बंदी घातली होती. यानंतर मुंबईत आल्यानंतर सलमानने आपलं स्पष्टीकरण दिलं होतं. पुढे हे जास्त काळ चाललं नाही.

कंगना रणौतची बहिण रंगोलीने याआधी स्पष्ट केलं होतं की, कंगना माफी मागणार नाही. कंगनाच्या म्हणण्यानुसार, मीडियाचा एक वर्ग आणि काही पत्रकार जाणून बुजून तिच्याविरोधात एका अजेंड्यानुसार, काम करत आहेत. आणि अशा लोकांची माफी मागणार नाही. सध्या अनेक पत्रकारांनी कंगनाच्या बातमीवर किंवा कव्हरेजवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

बालाजी टेलिफिल्मने या प्रकरणी बोलताना म्हटले आहे की, “तो दिवस खूप वाईट होता. या घटनेमुळे सिनेमाच्या पूर्ण टीमला शिक्षा मिळता कामा नये.”

 

आरोग्यविषयक वृत्त

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सावधान ! तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स