अभिनेत्री प्रेक्षा मेहतानंतर आता ‘या’ 29 वर्षीय अ‍ॅक्ट्रेसची आत्महत्या, बॉयफ्रेंडवर केला धोका दिल्याचा आरोप !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  मनोरंजनाच्या दुनियेतून आणखी एका अभिनेत्रीच्या आत्महत्येची खबर समोर आली आहे. कन्नड अॅक्ट्रेस चंदना हिनं 28 मे रोजी विष पिऊन आत्महत्या केली आहे. 29 वर्षीय चंदनानं बंगळुरूमधील तिच्या घरी आत्महत्या केली. चंदनानं आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ रेकॉर्ड केलं आहे. ज्यात तिनं तिच्या बॉयफ्रेंडवर धोका दिल्याचा आरोप केला आहे.

चंदनानं आत्महेत्येपूर्वीच एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. हा व्हिडीओ तिनं बॉयफ्रेंड आणि तिच्या कुटुंबियांना पाठवला होता. जेव्हा त्यांना चंदनाचा हा व्हिडीओ मिळाला तेव्हा त्यांनी लगेच चंदनाच्या शेजाऱ्यांना याबाबत माहिती दिली. यानंतर चंदनाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं परंतु तेव्हा खूप उशीर झाला होता.

रिपोर्टनुसार, चंदना दिनेश नावाच्या मुलाला काही वर्षांपूर्वीच डेट करत होती. जेव्हा ती दिनेशकडे लग्नाचा विषय काढत असे तेव्हा तो तिला टाळत असे. चंदनाच्या घरचे मात्र तिच्या या लग्नाच्या विरोधात होते. परंतु ती मात्र दिनेशच्या प्रेमात पागल होती.

मीडिया रिपोर्टनुसार चंदनानं तिच्या व्हिडीओत असाही आरोप केला की, दिनेशचं तिच्या व्यतिरीक्त आणखी काही मुलींशी अफेअर होतं. तो तिला धोका देत आहे असं ती म्हणाली आहे. दिनेश तिची फसवणूक करत आहे हे चंदनाना सहन झालं नाही आणि तिनं जीवनंच संपवलं. चंदनाच्या आत्महत्येच्या घटनेनंतर दिनेशही फरार आहे.