अभिनेत्री आलिया भट्टला ‘वहिनी’ बनवण्याबाबत काय विचार करते ‘बेबो’ करीना कपूर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या अफेअरची गेल्या वर्षभरापासून चर्चा सुरू आहे. नुकतीच करीना कपूर आणि आलिया भट्ट एकत्र दिसल्या. यानंतर करीनाला तिच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तिने दिलेल्या उत्तरावरून स्पष्ट दिसत आहे की, करीना आलियाला आपली वहिनी बनवण्यासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे.

मुंबईत रविवारी जिओ मामी मु्व्ही मेला विद स्टार्स 2019 (Jio MAMI Movie Mela with Star) या इव्हेंटमध्ये आलिया आणि करीना एकत्र दिसल्या. यावेळी करण जोहरने आलिया विचारले की, कधी तू विचार केला होता का की, एक दिवस करीना कपूर तुझी ननंद बनेल ? करीनाच मध्ये बोलली की, “मी जगातील सर्वात आनंदी मुलगी आहे.”

आलियाही लाजत लाजत म्हणाली, “खरं तर मी असा कधीच विचार केला नव्हता. आता मी या सगळ्याचा विचार का करू. आम्ही जर इथे पोहोचलो आहोत. आम्ही हा ब्रिज पार केला आहे.”

आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या सिनेमात ती दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत रणबीर कपूर आणि बिग बी अमिताभ बच्चनही दिसणार आहेत. याशिवाय तिच्याकडे RRR आणि सडक हे सिनेमेदेखील आहेत.

https://www.instagram.com/p/B3kKQ1qFFjx/

https://www.instagram.com/p/B3j6cNSlr-i/

https://www.instagram.com/p/B3j5ukSlb9D/

https://www.instagram.com/p/B3mARf4FGZM/

https://www.instagram.com/p/B3b6rMcFSme/

https://www.instagram.com/p/B3YiQUJl-TY/

 

Visit : Policenama.com