‘बेबो’ करीनानं शेअर केली Instagram Vs Reality पोस्ट ! व्हायरल होतोय फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्ट्रेस करीना कपूर (Kareena Kapoor) आणि तिचा पती ॲक्टर सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या घरी आता नवा पाहुणा येणार आहे. सैफ आणि करीना दुसऱ्यांदा आईबाबा होणार आहेत. लवकरच तैमूर अली खानला (Taimur Ali Khan) भावंड मिळणार आहे. सध्या करीना तिचा प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करत आहे. या काळात ती सोशलवर ॲक्टीव्ह दिसत आहे. करीना तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिनं प्रेग्नंसीमध्ये योगा करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर केले होते. पुन्हा एकदा तिनं इंस्टाग्राम व्हर्सेज रिॲलिटी पोस्ट शेअर केली आहे. यात ती काफ्तान घालून स्टाईलमध्ये पाऊट करताना दिसत आहे.

करीनानं तिच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात ती इंस्टाग्राम वर्सेज रिॲलिटी असं कॅप्शनही दिलं आहे. तिला काफ्तान घालायला खूप आवडतं. तिचा सोशलवरील खरा अवतार आहे. याआधीही तिनं अशा प्रकारचे कॅप्शन खूपदा दिले आहेत. काफ्तान घालणं पाऊट करणं तिला खूप आवडतं असंही तिनं सांगितलं आहे.

करीनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनुष्काच्या या पोस्टवर अनेकांनी अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी ही पोस्ट शेअर देखील केली आहे.

दरम्यान पती सैफनं हे कंफर्म केलं आहे की, करीना दुसऱ्या बाळाला जन्म कधी देणार आहे. आधी तर असं सांगितलं जात होत की, करीना मार्चमध्ये बाळाला जन्म देणार आहे. परंतु आता सैफ अली खाननं सांगितलं आहे की, करीनाची ड्यु डेट मार्च नाही तर फेब्रुवारी आहे. सैफनं कंफर्म केलं की, करीना फेब्रुवारीतच बाळाला जन्म देणार आहे.

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं अंग्रेजी मीडियम सिनेमात काम केलं आहे. हा सिनेमा 13 मार्च 2020 रोजी रिलीज झाला होता. लवकरच ती करण जोहरच्या तख्त या मल्टीस्टारर सिनेमातही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे. करीनाकडे लाल सिंह चड्ढा हा सिनेमाही आहे. या सिनेमात ती आमिर खानसोबत काम करणार आहे. पुढील वर्षी ख्रिसमसला हा सिनेमा रिलीज होणार आहे.