Kiara Advani Angry On Reporter : पत्रकारावर भडकली कियारा आडवणी ! जाणून घ्या नेमकं प्रकरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार कियारा आडवाणी (Kiara Advani) चा इंदू की जवानी (Indoo Ki Jawani) हा सिनेमा दि 11 डिसेंबर रोजी (वार- शुक्रवार) थिएटरमध्ये रिलीज झाल आहे. कोरोना सिनेमाला जास्त प्रेक्षक तर नाही मिळाले परंतु प्रेक्षकांना सिनेमा आवडला आहे. अशातच आता कियाराचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यात एका पत्रकाराला रागावताना दिसत आहे.

कियाराचा हा व्हिडीओ खूप जुना आहे. व्हिडीओत कियारा एक प्रॉडक्टबद्दल बोलत असते. पत्रकार तिला काही प्रश्न विचारत असतात. अशात एका रिपोर्टनं तिला कायरा किंवा कायारा असा उल्लेख करत आवाज दिल्यासारखं वाटतं. यानंतर कियारा चांगलीच भडकते.

कियारा म्हणते, तुम्ही मला काय म्हणालात कायारा? तुम्ही कायरा म्हणाला की, कियारा ? तुम्ही माझं नाव चुकीचं घेतलं म्हणून मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही. तसं पाहिलं तर कियाराचे रागावणं एक चेष्टा होती. नंतर ती त्या रिपोर्टरच्या प्रश्नाचं उत्तर देते.

कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर गुडन्यूजनंतर आता तिच्याकडे अनेक सिनेमे आहेत. नुकतीच ती इंदू की जवानी मध्ये झळकली आहे. आता ती भूल भुलैया 2 आणि शेरशाह अशा मोठ्या सिनेमात काम करताना दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे जुग जुग जिय हा सनेमाही आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा लक्ष्मी हा सिनेमा रिलीज ओटीटीवर रिलीज झाला. गुड न्यूजनंतर कियारा आणि अक्षय कुमार लक्ष्मी सिनेमात पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत.