‘कबीर सिंह’ चित्रपटाच्या १ महिन्यानंतर कियारा आडवाणीने केला ‘खुलासा’, शूटिंगच्या वेळी…..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शाहिद कपूर आणि कियारा आडवाणीचा सुपरहिट चित्रपट ‘कबीर सिंह’ ला प्रदर्शित होऊन एक महिना पुर्ण झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली धमाल केली. हा चित्रपट २१ तारखेला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने सगळ्यांच्या मनावर राज्य केले. या चित्रपटाला एक महिना पुर्ण झाल्यानंतर कियाराने चित्रपटाला जोडलेल्या अनेक गोष्टी शेअर केल्या आणि एक भावनिक पोस्ट लिहली.

कियारा आडवाणीने इन्स्टाग्रामवर चित्रपट ‘कबीर सिंह’चा पोस्टर शेअर करून सांगितले की, ‘कबीर सिंह’मधील प्रितीची भूमिका खूप वेगळी आहे. प्रितीची भूमिका खूप लाजणारी आहे. याचा अनुभव ही तिने शेअर केला.

कियारा आडवाणीने आपल्या पोस्टमध्ये शाहिद कपूर आणि डायरेक्टर संदीप वांगाचे खूप कौतुक केले आहे. तिने लिहले की, माझी आणि शाहिदची चांगली मैत्री आहे. ज्याने एका प्रवासासारखी ही कथा पुर्ण केली आणि याला वास्तविक आणि विश्वसनीय बनवले. मी पहिल्यापासूनच त्याच्या वेडेपणाची आठवण काढते.

संदीप वांगाचे कौतुक करताना कियारा आडवाणी म्हणाली की, ‘चित्रपटासाठी त्याचे वेडेपण, ईमानदारीमुळे आम्हाला अशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली जी अपुर्ण आणि वास्तविक आहे. तुम्हाला ही जाणीव झाल्याशिवाय राहणार आहे.’ या व्यतिरिक्त कियारा आडवाणीने प्रोड्यूसर्स म्यूजिक डायरेक्टर आणि चाहत्यांचे आभार मानले.

शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांचा स्टार चित्रपट ‘कबीर सिंह’ने बॉक्स ऑफिसवर २५० कोटींची कमाई केली. यासोबतच ‘कबीर सिंह’ या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये सगळ्यात कमाई करणारा चित्रपट ठरला.

आरोग्यविषयक वृत्त

‘या’ तेलाच्या वापराने वाढत नाही वजन, खास फायदे जाणून घ्या

डायबिटीजच्या रुग्णांसाठी कडीपत्ता रामबाण औषध, जाणून घ्या ७ फायदे

पिंपल्सने त्रस्त आहात ? ‘हे’ आहेत ९ खास उपाय, त्वचाही होईल ‘आकर्षक’

पावसाळ्यात ‘हे’ ८ वर्कआऊट केल्यास जिमची गरज नाही, जाणून घ्या

घराच्या भिंतीवरील पालींपासून खूप त्रस्त असाल तर ‘हे’ ८ उपाय करा, जाणून घ्या

दररोज २ ते ३ काजू खाण्याचे फायदे जाणून घ्या, ‘हे’ उपाय करा

पिळदार शरीरयष्‍टी घडवण्यासाठी ‘हे’ उपाय करा