रिया चक्रवर्ती आणि शोविक मुंबईत घर शोधताना स्पॉट्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   तुरूंगातून जामिनावर सुटल्यानंतर रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक घराच्या शोधात पुन्हा एकदा स्पॉट झाले. गेल्या 2020 मध्ये दोघांनाही खूप त्रास सहन करावा लागला होता. ती वांद्रेमध्ये पुन्हा एकदा घर शोधताना दिसली. रिया चक्रवर्तीने गुलाबी रंगाचा टी-शर्ट घातला होता. त्यावर ‘लव्ह इज पॉवर’ लिहिले होते. याशिवाय तिने काळ्या रंगाची पँट आणि रंगीत मास्क घातला होता. शोविकने पांढर्‍या रंगाचे टीशर्ट, जीन्स आणि ब्लॅक जॅकेट परिधान केले होते.

दरम्यान, सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी दोघांना तुरुंगात गेले आहे.शोविक चक्रवर्तीला विशेष एनडीपीएस कोर्टाने 2 डिसेंबर रोजी जामीन मंजूर केला आहे. वास्तविक, सुशांतच्या मृत्यूच्या चौकशीसाठी ड्रग्स अँगलमध्ये नाव आल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्याला अटक केली. एवढेच नव्हे तर ईडीने रिया चक्रवर्तीचे अनेक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज सीबीआय आणि एनसीबीला शेअर केले होते.त्यात ड्रग्सच्या व्यवहार आणि वापराविषयीही बोलण्यात आले होते. रियाला 8 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती आणि 7 ऑक्टोबरला जामीन मिळाला होता. अलीकडेच रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी अधिकृत निवेदनात म्हटले की, “मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विधानाचे स्वागत करतो. सीबीआयने त्याचा तपास सार्वजनिक करावा. बोगस प्रकरणात रियाला अटक करण्यात आली आहे. एनसीबीकडे पुरावा नाही. बऱ्याच एजन्सींनी रियाला त्रास दिला होता आणि तिला तुरुंगातही जावे लागले होते. जोपर्यंत मुंबई हायकोर्टाने तिला जामीन मंजूर केला नाही.

रियाने सुशांतच्या बहिणीविरूद्ध एफआयआर दाखल करत आरोप केला आहे की, सुशांतचा मृत्यू त्याच्या चुकीच्या औषधांमुळे झाला असावा. दरम्यान, सुशांतचा मृत्यू 6 महिन्यांपूर्वी झाला होता. सुशांतसिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांचे प्रेमसंबंध होते.पण सुशांतच्या मृत्यूच्या काही काळ आधीच रिया त्याचे घर सोडून गेली होती.त्यानंतर सुशांतच्या मृत्यूनंतर सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरूद्ध एफआयआर दाखल केला होता.