अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत मोठी बातमी ! या देशांमध्ये मोठ्या पडद्यावर होईल रिलीज

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अक्षय कुमारचा चर्चित चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ विषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. दिवाळीच्या वेळी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणारा हा चित्रपट काही देशांच्या चित्रपटगृहांतही दाखविला जाणार आहे. कोरोना व्हायरस साथीच्या आजाराने बाधित 2020 या वर्षामध्ये अक्षयचा मोठ्या स्क्रीनवर हा पहिला चित्रपट प्रदर्शित होईल. दिवाळीचा सण चित्रपटसृष्टीमध्ये एक प्रमुख प्रसंग म्हणून पहिला जातो. बिग बजेट आणि स्टारकास्ट चित्रपट या निमित्ताने प्रदर्शित होण्यास उत्सुक असतात, परंतु 2020 मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे चित्रपटगृहे बंद झाली आहेत. यामुळे, भारतात दिवाळीत कोणताही चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार नाही.

 

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ 9 नोव्हेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे, परंतु काही देशातील प्रेक्षक लक्ष्मी बॉम्बला मोठ्या पडद्यावर पाहण्यास सक्षम असतील. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार 9 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युएई मधील चित्रपटगृहात ‘लक्ष्मी बॉम्ब’ प्रदर्शित होत आहे. याशिवाय हा चित्रपट अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडामधील हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास राघव लॉरेन्स दिग्दर्शित ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. हा तमिळ ब्लॉकबस्टर ‘मुनी २- कांचना’ चा अधिकृत रिमेक आहे. यापूर्वी हा चित्रपट ईदवर प्रदर्शित होणार होता, पण कोविड – 19 चा उद्रेक झाल्यानंतर सिनेमा बंद झाल्यामुळे पुढे ढकलण्यात आला. ‘लक्ष्मी बॉम्ब’ मध्ये अक्षय पहिल्यांदा ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी फिमेल लीड रोलमध्ये आहे. अक्षयने 16 सप्टेंबर रोजी रिलीजची तारीख जाहीर केली. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले- “या दिवाळीत तुमच्या घरात लक्ष्मीबरोबर एक धमाकेदार बॉम्बही येईल.” येत आहे ‘लक्ष्मी बॉम्ब’.

अक्षय सध्या ‘बेलबॉटम’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आहे. अलीकडेच चित्रपटाचे ग्लासगो शेड्यूल पूर्ण झाले असून चित्रपटाच्या पुढील शेड्युलची शूटिंग लंडनमध्ये चित्रीत केले जाणार आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.