‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री दुसऱ्यांदा ‘प्रेग्नंट’, शेअर केले ‘बेबी बंप’चे फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बोल्डनेससाठी बॉलिवूडमध्ये फेमस असणारी अभिनेत्री लिसा हेडन दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. सध्या ती आपला प्रेग्नंसीचा पीरियड एन्जॉय करताना दिसत आहे. नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत जे सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. समोर आलेल्या फोटोंमध्ये लिसा बेबी बंप प्लाँट करताना दिसत आहे. बोल्डनेससाठी फेमस असणारी लिसा दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे.

लिसानं सुंदर फोटोशु केलं आहे. या फोटोशुटमधील काही फोटो लिसानं इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. लिसा पोस्ट प्रेग्नंसीबद्दलही बोलताना दिसत असते. लिसा बोल्डनेसव्यतिरीक्त आपल्या फिटनेसला घेऊनही चर्चेत असते. आपल्या पहिल्या प्रेग्नंसीनंतर काही महिन्यांनंतरही ती जुन्या शेपमध्ये आली होती. यानंतर आता 2 वर्षांतच ती दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहे.

लिसाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ऑक्टोबर 2016 मध्ये तिनं डिनो लालवानीसोबत लग्न केलं होतं. यानंतर मे 2017तिनं आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. फोटोशुटपासून ते व्हॅकेशन आणि आता प्रेग्नंसीबद्दल लिसानं फोटो चाहत्यांसबोत शेअर केले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/